‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला राणादा म्हणजे अभिनेता हार्दिक जोशीच्या आगामी ‘जाऊ बाई गावात’ या रिअॅलिटी शोची चांगली चर्चा सुरू आहे. एक अफलातून संकल्पना असलेला हा नवीन रिअॅलिटी शो ४ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. श्रीमंत आणि शहरात वाढलेल्या मुली गावरान आयुष्य जगू शकणार का? हेच ‘जाऊ बाई गावात’ या शोमध्ये पाहायला मिळणार आहे. नुकतंच या शोचं जबरदस्त टायटल ट्रॅक प्रदर्शित झालं आहे.
‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हार्दिक जोशीच्या ‘जाऊ बाई गावात’ शोचं टायटल ट्रॅक शेअर करण्यात आलं आहे. हे जबरदस्त टायटल ट्रॅक शेअर करत लिहीलं आहे की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच गाणं वाजणार…आता मज्जा येणार…’जाऊ बाई गावात’चा हा गावरान टायटल ट्रॅक तुमच्या भेटीला.
हेही वाचा – आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?
हेही वाचा – “हसवतात, रडवतात अन्…”, अंकुश चौधरीने पहिल्याच दिवशी पाहिला ‘झिम्मा २’! शेअर केलेली पोस्ट चर्चेत
दरम्यान, या शोमधील ६ स्पर्धकांची नाव जाहीर झाली आहेत. पहिली स्पर्धेक आहे, श्रीमंत घरची नात, जिला घाबरतात सर्व घरात अशी स्नेहा भोसले. दुसरी स्पर्धक आहे, पापा की परी संस्कृती साळुंखे. तिसरी स्पर्धक आहे फॅशन दिवा रसिका ढोबळे. चौथी स्पर्धक आहे, प्लस साइझ मॉडेल हेतल पाखरे. या शोची पाचवी स्पर्धक आहे सुरेल संस्कारी श्रेजा म्हात्रे. सहावी स्पर्धक आहे, मोनिशा आजगावकर. ४ डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे