कलाविश्वातील लोकप्रिय हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. दोघांच्याही घरी लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. हार्दिक-अक्षयाचे लग्नाआधी केले जाणारे केळवणही पार पडले आहे.
अक्षयाने लग्नातील ती नेसणार असलेल्या साडीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या साडीतील एक एक धागा जवळच्या असलेल्या खास व्यक्तींच्या हातून विणला जात आहे. हार्दिकसह अभिनेत्री वीणा जगताप, रुचा आपटे यांनीही अक्षयाच्या लग्नातील साडीचा एक धागा विणला. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हिडीओ शेअर करत पोस्टला छान कॅप्शनही दिलं आहे. “विणकाम सोहळा. ही पोस्ट शेअर करायला थोडा उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व. पण त्या दिवसाइतकीच ही पोस्टही मला परफेक्ट करायची होती. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुम्ही लग्नात नेसणार असलेल्या साडीतील एक धागा विणत आहेत, हे किती छान आहे. या भावना शब्दांत मांडता येणार नाहीत”, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा >> रस्त्यावरील छोट्या मुलीला पैसे दिल्यानंतर दुसरा मुलगाही काजलच्या गाडीमागे धावला अन्…, पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> साजिद खानची ‘बिग बॉस’च्या घरातून हकालपट्टी करण्यासाठी शर्लिन चोप्राचं केंद्रीय मंत्र्याला पत्र, म्हणाली…
अक्षयाने या सगळ्यांचे आभारही मानले आहेत. “या विणकाम सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. एवढी छान कल्पना आम्हाला दिल्याबद्दल सौदामिनी हॅण्डलूमचे धन्यवाद. यामुळे माझ्या लग्नाची साडी आणखीनच खास बनली आहे”, असंही पुढे तिने म्हटलं आहे.
हेही पाहा >> Photos : आलिया भट्टने पहिल्यांदाच केलं मॅटर्निटी फोटोशूट; बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं पाऊट
हार्दीक जोशी आणि अक्षया देवधर छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांची राणा दा आणि पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मे महिन्यात साखरपुडा करत आश्चर्याचा धक्का त्यांनी चाहत्यांनी दिला. आता ते लवकरच विवाहबंधनात अडकून त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत.