छोट्या पडद्याची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. संध्याकाळी ७ ते रात्री १० या वेळेत आजही घराघरांत मालिका पाहिल्या जातात. सध्या मराठी वाहिन्यांमध्ये टीआरपीसाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. याचमुळेच गेल्या काही महिन्यांमध्ये मराठी वाहिन्यांवर नवनवीन शो, मालिका सुरू करण्यात आले आहेत. लवकरच ‘झी मराठी’ वाहिनीवर एक नवीन रिअ‍ॅलिटी शो सुरू होणार आहे. या शोचा प्रोमो ‘झी मराठी पुरस्कार’ सोहळ्यात प्रदर्शित करण्यात आला.

‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘जाऊ बाई गावात’ हा नवीन शो सुरू होणार आहे. काही दिवसांपूर्वी झी मराठीने “करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार” असं कॅप्शन देऊन एक प्रोमो शेअर करण्यात आला होता. तेव्हापासून या शोचं नेमकं नाव काय आहे? याबाबत प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर पुरस्कार सोहळ्यात या नव्या शोचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Anniversary
शोमध्ये पहिली भेट ते श्री व सौ! मुग्धा-प्रथमेशच्या लग्नाला १ वर्ष पूर्ण होताच खास पोस्ट; ‘त्या’ कॅप्शनने वेधलं लक्ष
Marathi actress Rupal Nand will appear in Tu Hi Re Maza Mitwa
ती पुन्हा येतेय! अभिजीत आमकर-शर्वरी जोगच्या ‘तू ही रे माझा मितवा’ नव्या मालिकेत ‘स्टार प्रवाह’चा जुना लोकप्रिय चेहरा झळकणार
Bigg Boss Marathi Season 5 Fame Yogita Chavan Dance video viral
Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…
Punha Katvya Aahe
Video: “हा सगळा कट माझ्या आईने…”, वसुंधराची बाजू मांडताना आकाश आईच्या विरोधात जाणार; नेटकरी म्हणाले, “तुझा अभिमान…”
zee marathi three serial time slot change
२३ डिसेंबरपासून ‘झी मराठी’वर होणार मोठा बदल! ३ मालिकांच्या वेळा बदलल्या, ‘ही’ सिरीयल होणार बंद, तर नवीन मालिका…
Rang Maza Vegla fame ashutosh gokhale will see in villain character in Tu Hi Re Maza Mitwa new serial
‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेता झळकणार ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत, साकारणार खलनायकाची भूमिका

‘जाऊ बाई गावात’ असं या नवीन गेमिंग रिअ‍ॅलिटी शोचं आहे. या शोच्या निमित्ताने ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेता हार्दिक जोशी अर्थात प्रेक्षकांचा लाडका राणादा याने पुन्हा एकदा झी मराठीवर कमबॅक केलं आहे. पुरस्कार सोहळ्यात प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना राणादाची झलक पाहायला मिळाली.

‘झी मराठी’च्या ‘तुझ्यात जीव रंगला’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकांमध्ये हार्दिक जोशीने मुख्य भूमिका साकारली होती. ‘जाऊ बाई गावात’ या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये राणाबरोबर एका बैलाची झलक पाहायला मिळत आहे त्यामुळे ‘तुझ्यात जीव रंगला’मधील साहेबराव इथेही दिसेल का? अशी उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, हा नवीन शो गावच्या पारंपरिक संस्कृतीवर आधारित असेल असंही प्रोमो पाहून लक्षात येत आहे.

Story img Loader