मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी नेहमी चर्चेत असतात. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून दोघे घराघरात पोहचले. अक्षया आणि हार्दिक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. हार्दिकने अक्षयाला भेट म्हणून एक महागडी वस्तू दिली आहे. अक्षयाने सोशल मीडियावर भेट दिलेल्या वस्तूचा फोटो शेअर केला आहे.

हेही वाचा- ‘अनुपमा’ फेम अभिनेत्रीने सांगितलं चित्रपटांपासून दूर राहण्याचं कारण, म्हणाली, “कास्टिंग काऊच…”

actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
marathi actress spruha joshi sister kshipra joshi baby shower ceremony photos viral
स्पृहा जोशी होणार मावशी, बहिणीच्या डोहाळे जेवणाचे फोटो केले शेअर, माफी मागत म्हणाली…
ranveer allahbadia dating actress nikki sharma
प्रसिद्ध युट्युबर रणवीर अलाहाबादियाने शेअर केला गर्लफ्रेंडचा फोटो? ‘या’ अभिनेत्रीला करतोय डेट? चाहत्यांनीच केला खुलासा
Govinda daughter Tina Ahuja opens up about failed Bollywood career
बाबा सुपरस्टार अन् लेकीचं एका चित्रपटानंतर करिअर संपलं; गोविंदाची मुलगी म्हणाली, “मला खूप वैताग…”

हार्दिकने अक्षयाला आयफोन १५ प्रो मॅक्स भेट म्हणून दिला आहे. अक्षयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या फोनबरोबरचा फोटो शेअऱ केला आहे. गिफ्टमध्ये आयफोन दिल्याबद्दल अक्षयाने हार्दिकचे आभार मानले आहेत. या फोटोवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. आयफोन मिळाल्याबद्दल अनेकांनी अक्षयाचे अभिनंदन केलं आहे.

अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशीने गेल्या वर्षी २ डिसेंबरला लग्नगाठ बांधली. पुण्यात त्यांच्या शाही विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सोशल मीडियावर दोघांच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेच्या सेटवर दोघांची पहिल्यांदा भेट झाली होती. मालिकेत दोघांनी नवरा-बायकोची भूमिका साकारली होती. हळू हळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि खऱ्या आयुष्यातही दोघांनी एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधली.

हेही वाचा- “हृदयाला छिद्र, रक्तवाहिन्या बंद आणि फक्त सहा महिने…” प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग, म्हणाली “तिला भूल देणंही…”

अक्षया आणि हार्दिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका संपल्यानंतर अक्षयाने आपलं स्वत:चं यूट्यूब चॅनेल सुरू केलं आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अक्षयाने याबाबतची घोषणा केली होती. या यूट्यूब चॅनेलवर अक्षया आपल्या दैनंदिन घडामोडींचे व्हिडीओ अपलोड करत असते, तर हार्दिक जोशी सध्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेत शुभंकर ही भूमिका साकारत आहे.

Story img Loader