‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी घराघरांत लोकप्रिय झाली. या दोघांनी मालिकेत ‘पाठकबाई’ आणि ‘राणादा’ या भूमिका साकारल्या होत्या. यांच्या ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. अखेर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यावर पुढे थोड्याच दिवसात हार्दिक-अक्षयाने खऱ्या आयुष्यात एकत्र यायचं असं ठरवलं. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहून प्रत्येकालाच सुखद धक्का बसला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हार्दित-अक्षया यांची जोडी चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ते दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आज राणादाने बायकोच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. हार्दिक व त्यांच्या मित्रमंडळींनी अक्षयासाठी वाढदिवसानिमित्त खास सरप्राइज प्लॅन केलं होतं. यानंतर अभिनेत्रीने केक कापून तिचा वाढदिवस साजरा केला. यानंतर आता लाडक्या बायकोच्या वाढदिवसानिमित्त हार्दिकने खास रोमँटिक पोस्ट लिहित तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : “अगं अगं जाऊबाई…”, ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम जानकी-ऐश्वर्याची रंगली जुगलबंदी, पुण्यात पार पडलं केळवण

अक्षया देवधरसाठी हार्दिकची खास पोस्ट

हार्दिक लिहितो, “माझ्या अद्भूत आणि सुंदर पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तू माझ्या आयुष्यातील सगळ्या जवळची आणि सर्वात खास व्यक्ती आहेत. तुझ्याशिवाय एक दिवसही कसा जाईल याची मी कल्पना देखील करू शकत नाही. मला आशा आहे की, यापुढील वर्ष देखील आपल्या आयुष्यात नवनवीन रोमांच घेऊन येतील. हॅप्पी बर्थ डे माय लाइफ पार्टनर #अहा”

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम पेज; स्क्रीनशॉट शेअर करत अभिनेत्री म्हणाली, “खूपच वाईट…”

नवऱ्याने शेअर केलेल्या या रोमँटिक पोस्टवर अक्षयाने कमेंट करत “आय लव्ह यू…” लिहित पुढे हार्ट इमोजी जोडला आहे. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने संपूर्ण घरात सजावट करून खास तिच्या वयाच्या क्रमांकाची (३०) डिझाइन असलेला केक कापल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : ‘डान्स दीवाने’मध्ये माधुरी दीक्षितने चिमुकलीसह केला जबरदस्त डान्स; बायकोसाठी डॉ. नेनेंनी मारल्या शिट्ट्या

दरम्यान, हार्दिक-अक्षयाने डिसेंबर २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाला मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार उपस्थित राहिले होते. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत त्यांनी एकत्र काम केलं होतं. मालिकेतील राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. आता प्रेक्षक यांच्या जोडीला पुन्हा एकदा ऑनस्क्रीन एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hardik joshi shares romantic post for wife akshaya deodhar on the occasion of birthday sva 00