Hardik Pandya Natasa Stankovic : क्रिकेटपटू हार्दिक पंड्या व मॉडेल नताशा स्टँकोविक यांचा गेल्या वर्षी जुलैमध्ये घटस्फोट झाला. दोघांनाही एक मुलगा आहे आणि मुलाचा ते दोघेही मिळून सांभाळ करत आहेत. घटस्फोटानंतर हार्दिकचं नाव जास्मिन वालियाशी जोडलं जात आहे. दोघांचे अनेक फोटो व व्हिडीओही व्हायरल होत असतात. याचदरम्यान आता नताशा पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल व्यक्त झाली आहे.
घटस्फोटानंतर हार्दिक व नताशा आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. हार्दिक ब्रिटीश गायिका व टीव्ही स्टार जास्मिन वालियाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहेत. तर नताशा मात्र सिंगल आहे. नताशा नुकतीच घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल बोलली आहे. तसेच पुन्हा प्रेमात पडण्यास तयार असल्याचं नताशाने म्हटलं आहे.
‘ईटाईम्स’शी बोलताना नताशा स्टॅनकोविकने कबुली दिली की ती पुन्हा प्रेमात पडण्यास तयार आहे. मागील वर्ष तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, पण आता ती आयुष्यात नवीन सुरुवात करण्यात तयार आहे.
काय म्हणाली नताशा?
पुन्हा प्रेमात पडण्याबद्दल नताशा म्हणाली,”हे वर्ष नवीन अनुभव, संधी आणि प्रेमासाठी आहे. होय मी प्रेमात पडायला तयार आहे. मी प्रेमाच्या विरोधात नाही. आयुष्यात जे काही येईल ते स्वीकारावं, या मताची मी आहे. योग्य वेळी योग्य गोष्टी घडतात, असं मला वाटतं. माझ्यासाठी प्रेम व विश्वास असलेली नाती महत्त्वाची आहेत. मला वाटतं की प्रेमाने माझा प्रवास आणखी सुंदर व्हायला हवा, तो परिभाषित होऊ नये.”
२०२४ मध्ये हार्दिक व नताशाचा घटस्फोट झाला. २०२४ हे वर्ष तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होतं, पण जे झालं त्यासाठी कृतज्ञ आहे. कारण कठीण काळ आपल्याला अधिक समजूतदार आणि सहनशील बनवतो, असं नताशाने नमूद केलं.
१९ जुलै २०२४ रोजी नताशा आणि हार्दिक यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून वेगळे होत असल्याचं जाहीर केलं. घटस्फोटानंतर अवघ्या एक महिन्यानंतर हार्दिकचे नाव ब्रिटिश मॉडेल जास्मिन वालियाशी जोडलं गेलं. दोघेही बरेचदा एकाच ठिकाणाहून फोटो पोस्ट करतात. जास्मिन हार्दिकच्या मॅचेस बघायलाही येते. पण अद्याप या दोघांनी अधिकृतपणे नात्याबद्दल भाष्य केलेलं नाही.