राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आज उपमुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीतील काही आमदारांना घेऊन त्यांनी बंडखोरी केली आणि विधान भवनात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीनंतर विविध पक्षांच्या नेत्यांसह मनोरंजनसृष्टीतूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनीही एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“उत्तम पटकथा लिहिण्याची…”, महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर स्वप्नील जोशीचे ‘ते’ ट्वीट व्हायरल

सचिन गोस्वामी यांनी फेसबूक पोस्ट करत राजकारण्यांना चपराक लगावली आहे. “महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट..भा ज पा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भा ज पा तील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार…(मतदारांची ऐशी तैशी..)” अशी पोस्ट सचिन गोस्वामी यांनी केली आहे. त्यांची फेसबूक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात आज झालेल्या राजकीय भूकंपाबाबत तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी, हेमंत ढोमे यांनीही प्रतिक्रिया दिल्या. तेजस्विनीने तर महाराष्ट्रातील राजकारणाचा भेळ असा उल्लेख केला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hasyajatra director sachin goswami on maharashtra politics ajit pawar deputy cm hrc