‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री वनिता खरातचा लग्नानंतर यंदा पहिलाच दसरा होता. दसऱ्याचा सण तिने पतीबरोबर साजरा केला. तिने दसऱ्यानिमित्त काही फोटो शेअर केले होते. त्यातला एक फोटो तिने पती सुमित लोंढेबरोबर शेअर केला होता. ज्यामध्ये वनिताच्या चेहऱ्यावर गोड हास्य दिसतंय, तर सुमित मात्र हसत नाहीये. यावरून हेमांगी कवीने त्यांच्या फोटोवर कमेंट केली, ज्याला वनिता व सुमित दोघांनी मजेशीर उत्तरं दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“म्हातारचळ लागलेले आजी-आजोबा” म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “तुमच्या घराण्यात…”

वनिताने सुमितबरोबरचा एक फोटो शेअर करत दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये वनिताने काळ्या काठांची केशरी रंगाची साडी नेसली आहे, तसेच नाकात नथ व गळ्यात दागिने घालून तिचा लूक पूर्ण केला. तर सुमितने जांभळ्या रंगाचा कुर्ता घातला होता. फोटोत वनिताच्या चेहऱ्यावर हास्य होतं, तर सुमित मात्र शांत उभा दिसतो.

फोटोमधील दोघांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून अभिनेत्री हेमांगी कवीने कमेंट केली. “हे नवरे लोक फोटोत हसत का नाहीत, कुणास ठाऊक? आमचा माणूस पण तसाच! बाकी गोड दिसताय तुम्ही,” असं हेमांगीने म्हटलं. त्यावर वनिता म्हणाली, “त्यांना त्याच्यात swag वाटत असावा.” हेमांगीच्या या कमेंटला सुमितने ‘मी हसतोय, पण मनातल्या मनात’ असं उत्तर दिलं. त्यावर हेमांगी म्हणाली, “हेच उत्तर आमच्या माणसाचं पण! म्हणजे तद्दन खोटंय हे.” त्यावर सुमित पुढच्या वेळी चांगली स्माईल देणार असं म्हणतो.

हेमांगी कवीने वनिता खरातच्या फोटोवर केलेली कमेंट (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, वनिता व सुमितच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे. फोटोत सुमित व वनिता खूप छान दिसत आहेत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemangi kavi comment on vanita kharat sumit loandhe photo see details hrc