मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे हेमांगी कवी. ती नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहून तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते. याचबरोबर समाजातील तिला खटकणाऱ्या गोष्टींवरही ती भाष्य करत असते. तिच्या या स्पष्ट वक्तेपणामुळे अनेक जातीला ट्रॉलिंगचा सामना करावा लागतो. परंतु बऱ्याच वेळा हेमांगी ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देताना दिसते. आता अशाच एका ट्रोलरला रिप्लाय देत तिने त्याची बोलती बंद केली आहे.

हेमांगीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत शूटिंगदरम्यान तिच्या पायाला दुखापत झाल्याचं सांगितलं. ‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेच्या सेटवर पायरी चढत असताना तिचा अंदाज चुकला आणि मुलीवर पायाच्या अंगठ्याचं नख बोटाच्या मागच्या बाजूला घुसलं. तिने त्यावर प्राथमिक उपचार केले परंतु तिला खूप वेदना होत होत्या. दुसऱ्याच दिवशी तिच्या नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग होता. हा प्रयोग कसा पार पडेल अशी सर्वांनाच काळजी होती. पण प्रयोगाच्या वेळी हेमांगीमध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि अडीच तास तिने रंगमंचावर नाटक सादर केलं. नाटक करत असताना तिच्या पायाला लागलं आहे, तिला वेदना होत आहेत हे सर्व ती विसरून गेली होती, असं तिने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
akshay kumar
‘हाऊसफुल ५’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारच्या डोळ्याला दुखापत
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

आणखी वाचा : शूटिंगदरम्यान हेमांगी कवीला दुखापत, त्याच अवस्थेत नाटकाचा प्रयोग केला अन् असं काही झालं की…; पोस्ट चर्चेत

हेमांगीने ही पोस्ट शेअर करताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. तिच्या चाहत्यांनी याचबरोबर मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्रमंडळींनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आणि तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला. पण एकाने या पोस्टवर “काहीपण टाकायचं आणि विषय द्यायचा,” अशी कमेंट करत तिच्यावर टीका केली. तर हेमांगीनेही ट्रोलरला चोख उत्तर दिलं. तिने लिहिलं, “कृपया मला अनफॉलो करा. हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठीही चांगलं राहील.”

हेही वाचा : Video: “प्रसिद्धी मिळावी म्हणून ही काहीही करते” म्हणणाऱ्यांना हेमांगी कवीचं जशास तसं उत्तर, व्हिडीओ चर्चेत

हेमांगीच्या या उत्तराने आता सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. तुझ्या या कमेंटवर लाईक्स आणि कमेंट्स करत नेटकरी तिला पाठिंबा दर्शवत आहेत.

Story img Loader