मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. तिने आतापर्यंत नाटक, मालिका, चित्रपट यासारख्या विविध क्षेत्रात काम केली आहेत. यात विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. हेमांगी कवी ही कायमच तिच्या वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. नुकतंच तिने तिच्या सासूबाईंबद्दल भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेमांगी कवीने नुकतंच ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये तिच्या सासूबद्दल भाष्य केले. यावेळी तिने सासरच्या घराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. तिच्या सासूबाई कायमच तिला कशा पाठिंबा द्यायच्या, तिला कशा सांभाळून घ्यायच्या, याबद्दलही ती मनमोकळेपणाने बोलली.
आणखी वाचा : “तिच्यामुळे मी…” हेमांगी कवीने तब्बल २ वर्षांनी सांगितलं ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ पोस्टमागील खरं कारण

तुझ्या लग्नानंतर नेमकं कोणत्या गोष्टीत बदल झाला, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली, “मी खरं सांगू का, तर माझ्या आई- वडिलांची पुण्याई की मला असं सासर भेटलं. हे इथे बोलायचं म्हणून असं काही सांगत नाही. पण तसंच आहे. माझं सासरसुद्धा अगदी टिपिकल मिडल क्लास आहे. त्यात माझी सासू चांगली खमकी होती.”

“अनेकदा कसं असतं ना की, घरच्यांना काहीच अडचण नसते. पण हे जे बिल्डिंगमधले किंवा आजूबाजूचे असतात ना त्यांना प्रॉब्लेम असतो की, अरे तुमची सून १०- १० वाजेपर्यंत सकाळी झोपते. तर माझी सासू खमकी, तेव्हा ती म्हणायची की, ती रात्री १२ वाजता शुटिंगवरून येते. मग ती १० वाजेपर्यंत झोपू दे किंवा १२ वाजेपर्यंत झोपू दे, तुम्हाला काय त्रास आहे?

आणखी वाचा : “आई-वडिलांनी आमच्यात कधीच भेदभाव केला नाही” हेमांगी कवीचा खुलासा, म्हणाली “उलट भावाला…”

बरं माझ्या सासरची खोली १८० ची होती. आम्ही त्यात राहायचो. आई- वडिलांची पुण्याई की मला अशी सासू मिळाली. मला तिला ‘आई असं आहे, आई तसं आहे’, हे तिला सांगाव लागलं नाही”, असे हेमांगी कवीने म्हटले.

दरम्यान हेमांगी कवी ही ‘कलर्स मराठी’वरील ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेच्या मुख्य भूमिकेत झळकली होती. त्याबरोबरच तिने ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातही काम केले होते. विविध नाटकांमध्येही तिने अनेक नाटकांमध्येही काम केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemangi kavi talk about her mother in law support during night shoot and mooring sleep nrp
Show comments