भारतात टीव्ही मालिका पाहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अनेक मालिका एका दशकापेक्षा जास्त काळापासून सुरू आहेत. टीव्ही कलाकार मालिकेत काम करण्यासाठी मोठी रक्कम आकारतात. आज आपण सर्वाधिक मानधन घेणाऱ्या काही टेलिव्हिजन अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत. या अभिनेत्री महिन्याला ४० लाख रुपयांपासून ते एक कोटी रुपये कमवतात.
“प्रत्येकामध्ये गुण-दोष…”, अश्विनी महांगडेने शेअर केला बॉयफ्रेंडबरोबरचा रोमँटिक व्हिडीओ
तेजस्वी प्रकाश सध्या भारतातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सध्या कलर्स टीव्ही ड्रामा ‘नागिन’च्या सहाव्या पर्वामध्ये दिसत आहे. तेजस्वी प्रकाशने बिग बॉस १५ मध्ये भाग घेतला होता तिथे ती दर आठवड्याला १० लाख रुपये कमावायची. तेजस्वी प्रकाशला नागिनच्या एक एपिसोडसाठी २ लाख रुपये मिळतात, असे वृत्त ‘सियासत’ने दिले आहे. तिचे उत्पन्न दरमहा ४० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.
‘अनुपमा’ फेम रुपाली गांगुली सध्याची सर्वात जास्त मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री आहे. जीक्यू इंडियाच्या रिपोर्टनुसार ती एका एपिसोडसाठी तीन लाख रुपये मानधन घेते. ती महिन्याकाठी ७५ लाख ते १ कोटी रुपये कमवते.
‘कुंडली भाग्य’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्या मालिकेच्या एका एपिसोडसाठी सुमारे एक लाख रुपये मानधन घेते. तसेच ब्रँड एंडोर्समेंटसाठी प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपये आकारते. ती महिन्याला ४० ते ५० लाख रुपये कमवते. तर, रुबीना दिलैक एका महिन्याचे २० ते २५ लाख रुपये मानधन घेते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉसच्या घरात असताना ती प्रत्येक आठवड्यासाठी ५ लाख रुपये मिळायचे.