हिना खान ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून तिला प्रसिद्धी मिळाली. गेले अनेक दिवस हिना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत होती. सोशल मीडियावरही सक्रिय राहून ती तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडींबद्दल माहिती देत असते. नुकतच तिच्या मॅनेजरचं लग्न झालं. त्या लग्नाला हिना आवर्जून गेली होती. पण त्या लग्नादरम्यान तिने असं काही केलं की नवऱ्या मुलाला एक लाख रुपये गमवावे लागले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : “त्यांनी माझे पैसे…” प्रसिद्ध दिग्दर्शक अनीस बज्मींचा ‘हेरा फेरी’चे निर्माते फिरोज नाडियादवालांबद्दल गौप्यस्फोट

हिना खानची मॅनेजर हिना लाड ही नुकतीच विवाहबद्ध झाली. हिना खान हिलाही या लग्नाचं निमंत्रण होतं. हिना हक्काने त्या लग्नात उपस्थित होती. आपल्या जवळच्या मैत्रिणीचं लग्न आहे असं समजून हिना तिथे वावरत होती. पण या लग्नात हिनाने असं काही केलं की नवरदेवाला थोडं थोडकं नाही तर १ लाख रुपयाचं नुकसान झालं.

हेही वाचा : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खानचं १३ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर ब्रेकअप? पोस्टमुळे चर्चेला उधाण

त्या लग्नात हिना खानने खूप मजा मस्ती केली. या लग्नात हिना मुलीच्या बाजूने असल्याने हिनाने सहकाऱ्यांबरोबर मिळून नवरदेवाचे बूट लपवले. ते बूट काही केल्या नवरदेवाकडच्या मंडळींना शेवटपर्यंत शोधता आले नाहीत. ते बूट नवरदेवाला परत देण्यासाठी त्यांच्यात बरीच वाटाघाटी झाली. मुलीकडच्यांनी हे बूट त्याला परत देण्यासाठी मोठी रक्कम मागितली. अखेर ते बूट परत घेण्याच्या बदल्यात नवरदेवाने १ लाख ११ हजार रुपये त्यांना देण्याचं मान्य केलं. हिना खान आणि तिच्या सहकाऱ्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच वायरल होत आहे.