‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली हिना खान एका आजाराशी झुंज देत आहे. या आजाराबाबत हिना खानने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने तिच्या चाहत्यांकडून मदत मागितली आहे.

हिना खानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधील फोटोमध्ये तिच्या हातात खजूर असल्याचं दिसून येतंय. याला कॅप्शन देतं हिनाने लिहिले, “मला गंभीर गॅस्ट्रोसोफेजल रिफ्लक्स (Gastroesophageal reflux disease- GERD) आजार झाला आहे आणि दुर्दैवाने रमजानमध्ये जर मी उपवास करत राहिले तर माझी तब्येत अजून खराब होते. आई म्हणते की, अजवा खजूर या आजाराशी लढायला मदत करू शकेल. तुम्ही काही घरगुती उपाय सुचवू शकाल का? तर कृपया इथे कमेंट करून सुचवा. मेसेज करू नका कारण खूप मेसेज असल्याने तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही.”

हिनाच्या या पोस्टवर काळजी व्यक्त करत तिच्या चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. काहीजणांनी तिला घरगुती उपायही सुचवले आहेत. तर “लवकर बरी हो”, “काळजी घे” अशा कमेंट्ससुद्धा नेटीझन्सने केल्या आहेत.

हेही वाचा… सारा अली खानने पाहिलाय ‘सैराट’ चित्रपट; रिंकू राजगुरूचा उल्लेख करीत म्हणाली…

दरम्यान, हिना खानच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘कसौटी जिंदगी की’ अशा मालिकांबरोबरच हिना ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ या रिअ‍ॅलिटी शोजमध्ये दिसली. कोमोलिका या खलनायिकाच्या पात्रामुळे ती लोकप्रिय झाली. हिनाने अनेक चित्रपटांमध्ये आणि वेब सिरिजमध्येही काम केलं आहे.

Story img Loader