अभिनेत्री हिना खान टीव्ही इंडस्ट्रीमध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. फक्त अभिनयच नाही तर सोशल मीडिया पोस्टमुळेही हिना बरीच चर्चेत असते. आता हिना खानचा नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्याची खूप चर्चा होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये हिना खान एरियल योग करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच घाम फुटेल. या व्हिडीओ खूप व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिना खानने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती छताला लटकलेल्या कापडाच्या सहाय्याने उलटं लटकून व्यायाम करताना दिसत आहे. हिनाने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “मी वटवाघूळ नाहीये. पण सध्या मला तसंच वाटतंय.” खरं तर या व्हिडीओचा शेवट खूप खतरनाक आहे. कारण हिना खान लटकलेल्या अवस्थेत हळू हळू वळते आणि अखेर असा स्टंट करते. जो पाहताना सर्वांनाच घाम फुटेल. ती वटवाघळाप्रमाणे पूर्णपणे उलटी लटकून उभी राहते.

आणखी वाचा-बिकिनी फोटो शेअर करत दिशा पाटनीने दाखवले स्ट्रेच मार्क्स; नेटकरी म्हणाले, “हे दाखवण्यासाठी…”

हिना खानचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आहे. अनेकांनी यावर कमेट्स केल्या आहेत. काही लोक गोंधळले आहेत आणि तिला विचारत आहेत, “अरे, पण तू नेमकं काय करू इच्छितेस.” दुसऱ्या एकाने लिहिलं, “फक्त स्टाइलसाठी कोणतीही जोखीम घेऊ नका.” काही लोकांनी हिनाला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तर काहींच्या मते त्यांनी बालपणी असं बरेचदा केलं आहे. तर मग हिना हे सगळं आता का करत आहे. असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आणखी वाचा- Video : जीवघेण्या अपघातातून थोडक्यात वाचला प्रसिद्ध अभिनेता, ट्रकवरील ताबा सुटला अन्…

अर्थात अशा प्रकारे जोखमीचे व्यायाम करताना हिना याआधीही अनेकदा दिसली आहे. याआधीही तिने अनेकदा अशाप्रकारे स्टंट करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षरा सिंघानियाची भूमिका हिना खानने साकारली होती. या मालिकेतून तिला स्वतःची वेगळी ओळख मिळाली होती. याशिवाय ती बिग बॉस आणि खतरों के खिलाडी या रिअलिटी शोमध्येही दिसली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan share aerial yoga video on instagram doing stunt goes viral mrj