अभिनेत्री हिना खान(Hina Khan) सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. अभिनेत्रीला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान झाले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या आजार आणि उपचारांबद्दल चाहत्यांना माहिती देत असते. आता हिना खानने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे आणि तिची प्रेरणास्रोत कोण आहे, याबद्दल लिहिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाली अभिनेत्री?

हिना खानने इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाउंटवरून फोटो शेअर केले आहेत. हा फोटो तिच्या डोळ्याचा असून, एकच पापणी दिसत आहे. ही पापणी माझा प्रेरणास्रोत आहे, असे हिनाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. हिनाने पोस्ट शेअर करताना लिहिले, “या पापण्या माझ्या डोळ्यांची सुंदरता वाढवायच्या. माझ्या पापण्या या आनुवंशिकतेने लांब आणि सुंदर होत्या. आता ही पापणी माझ्या बाजूने लढत एकटी उभी आहे. माझ्या शेवटच्या केमोथेरपीदरम्यान ही एक पापणी माझा प्रेरणास्रोत आहे. आपण हे सर्व पाहणार आहोत.”

हिना खान इन्स्टाग्राम

पुढे हिनाने लिहिले, “गेल्या दशकभरात किंवा त्याहून जास्त काळ मी कृत्रिम किंवा खोट्या गोष्टी परिधान केल्या नाहीत. आता मात्र मी माझ्या शूटिंगसाठी त्या वापरते. काही नाही, सगळं ठीक होईल”, असे म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्रीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करीत तिला धीर दिला आहे. तू लवकर बरी होशील, असेही म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “तू खूप धाडसी आहेस.” दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, “लवरकरच सगळं ठीक होणार आहे. आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत.” एक नेटकरी लिहितो, “तू लवकर बरी होणार आहेस.”

याबरोबरच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत अक्षराच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री लता सभरवालनेही या पोस्टवर, “तू अजूनही सुंदर दिसतेस. तुझ्यासाठी प्रार्थना करीत आहे”, अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा: “तुम्ही काळवीटाची शिकार करून ते शिजवून खाल्लं…”, भाजपा नेत्याची पोस्ट; सलमान खानला माफी मागण्याचा दिला सल्ला

याआधी हिनाने सोशल मीडिया अकाउंटवर केमोथेरपीमुळे तिला आजारांचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले होते. म्युकोसायटिस आजाराचे निदान झाल्याचे तिने सांगितले होते. २८ जूनला हीना खानने तिच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवर तिला कर्करोगाचे निदान झाल्याचे एक पोस्ट शेअर करीत सांगितले होते.

दरम्यान, हिना खान ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेद्वारे अक्षराच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये ती टॉप २ मध्ये पोहोचली होती. ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्येदेखील ती सहभागी झाली होती. काही म्युझिक व्हिडीओंमध्येही ती दिसली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan shares photo of last eyelash says this single eyelash is my motivation nsp