अभिनेत्री हिना खान काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘ये रिश्ता क्या कहलाता है’फेम हिना खानला स्तनांचा कर्करोग झाला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करीत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील कर्करोग झाला आहे. हिना या आजाराशी झुंज देत असून, तिनं यावरील उपचार आधीच सुरू केले आहेत. आता हिनानं तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करीत तिच्या या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा… सोनाक्षी सिन्हाने अनवाणी चालत पती झहीर इक्बालबरोबर शेअर केला ‘हा’ व्हिडीओ, म्हणाली, “जेव्हा तुम्ही…”

हिनानं लिहिलं, “माझ्या प्रवासाची एक खिडकी… ही पोस्ट माझ्यासारखी खडतर लढाई लढणाऱ्या त्या सर्व शूर महिला आणि पुरुषांसाठी आहे. माझी इच्छा आहे की, या सर्व लोकांसाठी माझा हा प्रवास धाडसी आणि प्रेरक व्हावा म्हणजे त्यांच्या आयुष्यातील हा टप्पा सहजपणे निघून जाईल. आणि लक्षात ठेवा की आपण घायाळ होऊ शकतो; परंतु आपल्याला घाबरून चालणार नाही.”

३६ वर्षीय हिना खानने शुक्रवारी २८ जून रोजी तिच्या इन्स्टाग्रामवर या आजाराबाबत सगळ्यांना माहिती देत पोस्ट शेअर केली आणि काही दिवसांपासून सुरू असलेल्या या अफवांना अभिनेत्रीनं पूर्णविराम दिला. स्वत:ला स्तनांचा कर्करोग झाल्याची माहिती तिनं चाहत्यांना दिली. ती बरी आहे आणि या आजारावर मात करण्यासाठी आवश्यक ते उपचार तिने सुरू केले आहेत, असं तिनं सांगितलं. या कठीण काळात तिचे कुटुंबीय तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि या कठीण काळात तिच्या प्रायव्हसीचा आदर करण्याची विनंती तिनं केली आहे.

ही पोस्ट शेअर केल्यानंतर अभिनेत्रीने एक इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. जी चर्चेत होती. “हा टप्पादेखील निघून जाईल” असं कॅप्शन देत अभिनेत्रीने २९ जून रोजी ही स्टोरी शेअर केली होती.

हेही वाचा… “नका करत जाऊ…”, ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकरांच्या ‘या’ व्हिडीओवर नेटकऱ्याची प्रतिक्रिया, म्हणाला…

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेध्ये अक्षराची भूमिका साकारून हिना खानने प्रसिद्धी मिळवली. ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या टीव्ही शोमध्येही ती स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. ‘हॅक्ड’, ‘डॅमेज्ड-२’ आणि ‘शिंदा शिंदा नो पापा’ अशा अनेक चित्रपटांध्ये आणि वेब सीरिजमध्ये ती दिसली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hina khan who diagnosed with breast cancer shared her journey on social media dvr