‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिना खानला तिसऱ्या टप्प्यातील स्तनांचा कर्करोग झाला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी हिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करीत माहिती दिली.

हिना या आजाराशी झुंज देत असून, तिनं यावरील उपचार आधीच सुरू केले आहेत. केमोथेरिपी घेतल्यानंतर आता हिना खानने एक नवीन पोस्ट चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने केमो घेतल्यानंतरचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोत हिनाने स्वत:चे सेल्फी शेअर केले आहेत. या फोटोमध्ये हिनाच्या मानेखाली आणि शरीराच्या काही भागांवर डाग आणि जखमा झालेल्या दिसतायत.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
hina khan cancer battle
कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने शेअर केले फोटो; प्रकृतीबद्दल अपडेट देत म्हणाली, “गेले १५ ते २० दिवस माझ्यासाठी…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Shashank Arora
“आम्ही वाळवंटात भारत-पाकिस्तानच्या बॉर्डरजवळ…”, इरफान खान यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगत अभिनेता म्हणाला, “मला पतंग…”
Rohit Sharma Statement on Mohammed Siraj and Travis Head Fight in IND vs AUS 2nd Test
IND vs AUS: “मर्यादा ओलांडायला नको…”, रोहित शर्माने सिराज-हेडच्या वादात भारतीय गोलंदाजाची घेतली बाजू, सामन्यानंतर केलं मोठं वक्तव्य

हेही वाचा… अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात २६ वर्षांपूर्वीच्या गाण्यावर ओरीसह थिरकल्या अनन्या पांडे आणि सारा अली खान, व्हिडीओ चर्चेत

केमोसाठी हिनाने आधीच आपले केस कापले होते. या कठिण काळातदेखील हिना अगदी हसत सगळ्या गोष्टींना सामोरं जाताना दिसतेय. या फोटोला कॅप्शन देत हिनाने चाहत्यांना विचारलं, “या फोटोत तुम्हाला काय दिसतंय? माझ्या अंगावरचे डाग की डोळ्यातील आशा?”

हिना पुढे म्हणाली, “हे डाग माझे आहेत, मी त्यांना प्रेमाने जपते. कारण- हे डाग माझ्या या आजारातील प्रगतीचं चिन्ह आहे. माझ्या डोळ्यातील आशा माझ्या आत्म्याचे प्रतिबिंब आहे, या डोळ्यांनी माझ्या आयुष्यात शेवटपर्यंत मी सकारात्मकतेचा प्रकाश पाहू शकतेय. मी माझ्या उपचारांबद्दल सकारात्मक विचार करतेय आणि मी तुमच्यासाठीदेखील प्रार्थना करतेय.”

हेही वाचा…“हिंदी म्हणजे आयुष्यात आलेली…”, ‘मॅडनेस मचाएंगे’ बंद होण्याच्या दोन दिवसाआधी कुशल बद्रिकेने शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

हिनाने शेअर केलेला हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. अनेक कलाकारांनी हिनाच्या या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री मसाबा गुप्ताने “तू तुझी काळजी घे हिना” अशी कमेंट केली आहे. तर मोना सिगंने कमेंट करत लिहिलं, “तू एक योद्धा आहेस हिना. तुझ्या आयुष्यातील हा टप्पादेखील लवकरच निघून जाईल.” तर अर्जुन बिजलानी, आरती सिंग, जुही परमार अशा अनेक कलाकारांनी कमेंट केली आहे.

दरम्यान, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेध्ये अक्षराची भूमिका साकारून हिना खानने प्रसिद्धी मिळवली. ‘बिग बॉस’ आणि ‘खतरों के खिलाडी’ सारख्या टीव्ही शोमध्येही ती स्पर्धक म्हणून ती सहभागी झाली होती. 

Story img Loader