हिंदी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री निशा रावल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. दैनंदिन जीवनात घडलेल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. काल तिनं जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिनं स्वतःच्या मनात आत्महत्या करण्याचा विचार आला होता, याचा खुलासा केला आहे. शिवाय निशा एकटेपणा, मानसिक तणाव, बायपोलर डिसऑर्डर याविषयी देखील बोलली आहे.

हेही वाचा – “डान्स करणं हा माझ्यासाठी फोबिया होता पण…”, ऐश्वर्या नारकर यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत; म्हणाल्या,”हे त्या लोकांसाठी…”

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
aishwarya narkar slams netizen who writes bad comments
“आई आणि बायकोवरून…”, आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “महिलांचा…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Suicide bombings in Pakistan
पाकिस्तानात आत्मघातकी बॉम्बस्फोट; २७ ठार, ६२ जखमी; बलुचिस्तान प्रांतातील रेल्वे स्थानक हादरले

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनानिमित्त निशाने एक व्हिडीओ शेअर करत भलीमोठं पोस्ट लिहीली आहे. या व्हिडीओमध्ये ती बऱ्याच सशांबरोबर दिसत आहे. या व्हिडीओवर “मलाही आत्महत्या करावीश वाटत होती,” असं तिनं लिहीलं आहे. तसेच कॅप्शनमध्ये निशाने लिहीलं आहे की, “आज जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन आहे आणि हा संवाद सामान्य करण्याचा मी प्रयत्न करत आहे. एक सेलिब्रिटी असल्याने आणि सतत मायक्रोस्कोपच्या खाली राहिल्याने एकटेपणा, चिंता, दबाव, तणाव अगदी मादक पदार्थांचे सेवन करण्यापर्यंत आणि इथपर्यंत पोहोचण्याचे कारण असू शकते. फक्त सेलिब्रिटी नाही तर दरवर्षी लाखो लोक आत्महत्या करतात. मी हा सर्व अनुभव घेतला आहे. सतत चिंतेत असल्यामुळे औषध घेतली आहेत. मी बायपोलर डिसऑर्डरने ग्रस्त आहे. माझं बालपण खूप एकाकी आणि त्रासदायक होतं. कारण मी एक विभक्त कुटुंबाचा भाग आहे. माझ्या एकट्या आईनं मला मोठ केलं. आई आणि मी एकत्र दोघींनी १२वीची परीक्षा दिली होती. जेव्हा माझी आई लहान होती, तेव्हा तिनं स्वतःच्या आईला गमावलं होतं. त्यामुळे तिनं स्वतःचा मार्ग कसा तयार केला, हे मी पाहिलं आहे.”

हेही वाचा – लक्ष्मीकांत बेर्डे यांचं आवडतं पुस्तक, नाटक अन् बरंच काही; ‘हा’ जुना व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले, “लक्ष्या मामा….”

पुढे निशाने लिहीलं आहे की, “माझ्या मित्र-मैत्रिणींनी माझी साथ सोडली होती आणि मी दुःखात बुडाले होते. मी तेव्हा एक मोठा श्वास घेतला. मी माझ्या लहान मुलाची शाळा कधीच चुकवली नाही. माझी आर्थिक समस्या असूनही मी घरी काही कमी पडू दिलं नाही. माझ्या घरी दररोज अन्न शिजवलं जात असे. या काळात मी उशीरा झोपून लवकर उठायचे. स्वतःला कामात व्यस्त ठेवायचे. कायदेशीर, भावनिक आणि सामाजिक लढाया लढताना पॉडकास्ट आणि ऑडिओबुक ऐकायचे. त्यानंतर माझ्या पायाला दुखापत झाली, त्याची शस्त्रक्रिया झाली. यामुळे मी अजून खचले. काही लोकांना वाटलं की, मी माझ्या वेदनांचा कांगावा करते, परंतु जे लोक यातून जातात, त्यांनाच या वेदना समजतील.”

हेही वाचा – ‘या’ तीन निकषांवर ‘नवा गडी नवं राज्य’ मालिकेची निर्माती श्रुती मराठे स्वीकारते काम; म्हणाली…

हेही वाचा – Video: ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेतील दोन अवनींची हार्दिकबरोबरची मज्जा-मस्ती, पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल

“मला फॉलो करणारे १ मिलियनपैकी कमीत कमी हजार लोक असे आहेत, जे खरच माझी काळजी घेतात आणि माझ्याकडून प्रेरणा घेतात. जर मी हार मानली, तर त्या हजार लोकांना प्रेरणा, ती ताकद देणं थांबेल. म्हणून मी तुम्हा सर्वांना सांगतेय की, तुम्ही एकटे नाहीयेत. आपल्या समस्या एकमेकांना सांगा आणि या समस्येतून जात असलेल्या दुसरा कोणीतरी शोधा. आपण एकत्र येऊन आत्महत्या थांबवू शकतो,” असं निशाने लिहीलं आहे. निशाची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होतं आहे.