आपल्या चित्रविचित्र कपड्यांच्या स्टाईलमुळे उर्फी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असतात. फॅशन सेन्समुळे लोक तिला खूप ट्रोल करत असतात. तिच्यावर मीम्सदेखील बनवले जातात. यामुळे ती अनेकदा अडचणीत देखील सापडली आहे. असे असले तरी, मागील काही दिवसांमध्ये तिच्या लोकप्रियतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
सोशल मीडियावर ट्रोल्सचा सामना करणारी उर्फी जावेद ट्रोलर्सना नेहमीच उत्तर देत असते. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुरु झालेल्या ‘बिग बॉस ओटीटी’ या कार्यक्रमामध्ये ती सहभागी झाली. या कार्यक्रमामुळे तिला लोकप्रियता मिळाली. सोशल मीडिया सेन्सेशन ‘हिंदुस्तानी भाऊ’ ऊर्फ विकास पाठक त्याच्या व्हिडीओमुळे खूप लोकप्रिय झाला होता. मध्यंतरी काही कारणामुळे त्याने व्हिडीओ बनवणे थांबवले होते. नुकताच त्याने नवा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
हा व्हिडीओ त्याने उर्फी जावेदला उद्देशून तयार केला आहे. यामध्ये तो “जय हिंद. हा संदेश आहे उर्फी जावेदसाठी, जी आजकाल स्वत:ला मोठी फॅशन डिझायनर समजायला लागली आहे. फॅशनच्या नावाखाली तू जसे कपडे घालतेस, त्याने समाजावर वाईट प्रभाव पडत आहे. ही भारताची संस्कृती नाहीये. तुझ्यामुळे लोकांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचत आहे वेळीच सुधर. नाहीतर मी तुला सुधारेन. भाऊ म्हणून सांगतोय आत्ताच सुधर”, असे म्हणतो. या व्हिडीओद्वारे त्याने अप्रत्यक्षरित्या उर्फीला धमकी दिली आहे असे तिचे चाहते म्हणत आहेत.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/11/bhau-1.jpeg?w=324)
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/11/bhau-2.jpeg?w=327)
या धमकीवजा व्हिडीओला उत्तर देण्यासाठी तिने हिंदुस्तानी भाऊचा जुना व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने ‘कोणी काय घालावं हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे’, असं म्हटले आहे. पुढच्या पोस्टमध्ये तिने “३ महिन्यापूर्वी या माणसाला माझ्या कपड्यांबद्दल काहीच आक्षेप नव्हता. आता अचानक माध्यमांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या कपड्यांबाबत बोलत आहे. प्रसिद्धीसाठी हापापलेले असे लोक काहीही करु शकतात”, असे लिहिले आहे.