‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमामुळे अभिनेता कुशल बद्रिके घराघरांत लोकप्रिय झाला. विनोदाचं अचूक टायमिंग साधत त्याने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सध्या अभिनेता सोनी टिव्हीवरील ‘मॅडनेस मचाऐंगे’ या कार्यक्रमातून प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. कुशल सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज संपूर्ण देशभरात होळी व रंगपंचमी या सणांचा उत्साह पाहायला मिळत आहे. सामान्य लोकांपासून मोठमोठ्या कलाकारांपर्यंत सर्वांनी होलिका दहन करून होळीचा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला. याच निमित्ताने कुशल बद्रिकेने इन्स्टाग्रामवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा : “८३ वर्षांचं आयुष्य ३ तासांत दाखवणं अवघड, पण…”, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ पाहून शरद पोंक्षे म्हणाले, “अंदमान पर्व…”

होलिका दहन केल्यावर पेटत्या होळीतून नारळ काढायचा अशी परंपरा महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आहे. यानुसार अभिनेत्याच्या पत्नीने देखील पेटत्या होळीतून नारळ काढल्याचा खास व्हिडीओ कुशलने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video : मालिकेचा सेट म्हणजे माझं घर! ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचं अनोखं होळी सेलिब्रेशन, म्हणाली, “माझ्या आईने…”

“पेटत्या होळीतला नारळ काढायचा आणि प्रसाद म्हणून खायचा. बालपणापासूनच्या खोड्या…बालपण मागे सुटत जातं, खोड्या सुटत नाहीत.” असं कॅप्शन देते कुशलने हा व्हिडीओ शेअर केला आहे. अभिनेत्याची पत्नी सुनयना यामध्ये पेटत्या होळीतून नारळ काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, कुशलने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी सणानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Holi 2024 kushal badrike wife sunayana performed holi rituals video viral sva 00