Home Minister Aadesh Bandekar : १३ सप्टेंबर २००४ मध्ये ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. “दार उघड बये…दार उघड” अशी धून वाजली की, घराघरांत ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम लागला हे समजून जायचं. या कार्यक्रमाने तब्बल २० वर्षांनी म्हणजेच १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाच्या घवघवीत यशाबद्दल गणेशोत्सव विशेष- ‘उत्सव बाप्पाचा, खेळ होम मिनिस्टरचा’ हा कार्यक्रम ‘झी मराठी’ वाहिनीकडून आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘पोस्टमन काका’ ही भूमिका साकारणाऱ्या सागर कारंडेने महाराष्ट्राच्या लाडक्या भावोजींसाठी एक खास पत्र वाचून दाखवलं. हे पत्र त्यांच्या लाडक्या ‘पैठणी’ने लिहिलं आहे. सागरने पत्र वाचताच आदेश बांदेकरांचे डोळे भरून आले होते. “पैठणीचं पत्र भावोजींना मिळणार, सारेच जण भावुक होणार…!” असं कॅप्शन देत हे पत्र वाचतानाचा प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीकडून इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : नवरा माझा नवसाचा २ : यंदा एसटी ऐवजी कोकण रेल्वे का निवडली? स्वत: सचिन-सुप्रिया यांनी सांगितलं कारण…; पाहा व्हिडीओ

आदेश बांदेकरांसाठी पैठणीचं पत्र ( Aadesh Bandekar )

सागर कारंडे हे पत्र वाचताना म्हणतो, “प्रिय आदेश भावोजी, मी तुमचीच पैठणी…श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या मला तुम्ही गावात, चाळीत आणि अगदी तळागाळात पोहोचवलंत. तुमचं काम खूप मोठं आहे. तुम्ही तिचं म्हणणं जगासमोर आणलंत. तिला बोलतं केलंत. खरंतर, ही पैठणी तिच्यामुळे सुंदर दिसते. हे तुम्हीच तिला सांगितलंत.”

होम मिनिस्टर : आदेश बांदेकर ( फोटो सौजन्य : झी मराठी ) Aadesh Bandekar

सागर कारंडे पत्र वाचताना आदेश बांदेकरांसह ( Aadesh Bandekar ) उपस्थित प्रेक्षक, सगळे कलाकार आणि त्यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर सुद्धा भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याबद्दल अभिनेते म्हणतात, “गेल्या २० वर्षांमध्ये साधारण ६ हजार ५०० भाग झाले. अंदाजे ६ लाख २२५० कुटुंबांबरोबर थेट संवाद साधता आला. या प्रवासात अनेक कुटुंबांना आणि माऊलींना भेटलो. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मला एक ऊर्जा मिळायची. आजही लाखो कुटुंब ‘होम मिनिस्टर’ची वाट बघत आहेत. पण आता वेळ झाली आहे विश्रांतीची… आज्ञा असावी.”

हेही वाचा : Video : ‘आई कुठे काय करते’ फेम अरुंधतीने मुंबईत घेतलं हक्काचं घर! लेकीसह दाखवली नव्या फ्लॅटची पहिली झलक, म्हणाली…

दरम्यान, ‘होम मिनिस्टर’ ( Aadesh Bandekar ) कार्यक्रमातील ‘अग्गंबाई सुनबाई’, ‘पैठणी माहेरच्या अंगणी’, ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’, ‘जाऊबाई जोरात’, ‘कोविड योद्धा विशेष’, ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘काहे दिया परदेस’ अशा सगळ्या पर्वांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister show ends postman sagar karande read letter for aadesh bandekar watch emotional video sva 00