नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमात अभिनेता शशांक केतकरने काम केले आहे. नुकतंच शशांक केतकरने मालिका क्षेत्रातील मानधनाबद्दल भाष्य केले. यावेळी त्याने त्याला सुरुवातीला किती मानधन मिळालं, याबद्दल सांगितले आहे.
शशांक केतकरने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मालिका विश्वाबद्दल विविध खुलासे केले. तसेच त्याने चित्रपटसृष्टी, काम करुन पैसे न मिळणे यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.
आणखी वाचा : Video : “गांधीजींची अहिंसा आणि मुस्लीम लांगूलचालन…” शरद पोंक्षेंच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, म्हणाले “मी सावरकरवादी…”
“होणार सून मी या घरची ही माझी सहावी मालिका आहे. मालिकांद्वारे तुम्ही घराघरात पोहोचता. त्यामुळे तुमचा चाहतावर्ग, प्रेक्षक वर्ग कितीतरी पटीने वाढत जातो. मालिकेमुळे तुम्हाला महिन्याचे २० ते २५ दिवस काम मिळणार आहे, याची मला खात्री असते.
सर्वच मालिकांमध्ये काम करणारे कलाकार हे पर डे वर काम करतात. इतके दिवस काम केल्यानंतर इतके हजार हे साधारण गणित डोक्यात असतं. माझी सुरुवात मी १२०० रुपयांपासून मी केली. आता वाढता वाढता वाढे ते एका ठराविक मानधनापर्यंत मी आलो आहे. त्यावेळीच्या मानधनाचाही मला आदर होता. पण त्या मानधनात अर्थात घर चालत नव्हतं. आता अर्थात घर, EMI हे सर्व चालवू शकतो”, असे शशांकने म्हटले.
आणखी वाचा : “प्रेक्षक ३०० रुपयात माझा चित्रपट का पाहतील?” शशांक केतकर स्पष्टच बोलला, म्हणाला “दाक्षिणात्य सिनेसृष्टीत…”
दरम्यान, मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. तो कायमच अनेक गोष्टींबद्दल त्याचे मत स्पष्टपणे मांडत असतो. सध्या शशांक ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मुरांबा’ या मालिकेत झळकत आहे. तसेच लवकरच तो एका चित्रपटातही झळकणार आहे.