चित्रपट, नाटक आणि मालिका यामध्ये विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे लीना भागवत या होय. त्या सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता मात्र एका मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लहानपणीचा एक मजेशीर किस्सा सांगितल्याने त्या चर्चेत आल्या आहेत.

काय म्हणाल्या लीना भागवत?

अभिनेत्री लीना भागवत यांनी ‘व्हायफळ’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्यावेळी अभिनेत्री लीना भागवत यांनी त्यांच्या शाळेतील एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. लीना भागवत यांनी म्हटले, “नंबरनुसार मी बऱ्याचदा मॉनिटर झाले आहे, पण जबाबदारी दिली आहे तर आपण ते काम करूया असं होतं. निबंध आणि वत्कृत्व स्पर्धेत मी भाग घ्यायचे. तेव्हा माहीत नव्हतं की हे सगळे कलागुण नंतर आपल्याला आयुष्यात उपयोगी पडणार आहेत.”

Kartik Aaryan Recalls His Struggle
वारंवार नकार तरी मानली नाही हार; कार्तिक आर्यनने शेअर केल्या संघर्ष काळातील आठवणी, म्हणाला, “मला लाज…”
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Walmik Karad Mother Parubai Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर आईची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “आता मी मेल्यावर पाणी पाजायला…”
Tharla Tar Mag Fame Actors Dance Video
“मुझको क्या हुआ है…”, ‘ठरलं तर मग’ फेम चैतन्य अन् कुसुमचा शाहरुख खानच्या गाण्यावर जबरदस्त डान्स! कमेंट्सचा पाऊस…
Manoj Jarange
Manoj Jarange : मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल, “खंडणीतला आरोपी तुमचं सरकार….”

“मला आठवत नाही की मी कधी सरळ उभी राहून एखादी कविता म्हटली आहे. मला हातवारे करत कविता म्हणायला इतकी आवडायची की, बाई मला सांगायच्या की लीना तू कविता म्हण. मग मी कविता म्हणणार. मला आठवतंय चांदोबाला आईने मारली थप्पड अशी ओळ त्या कवितेत होती. ते म्हणताना मी स्वत:ला इतक्या जोरात मारून घेतलं होतं. बरं वर्गात मारून घेतलं तेव्हा काहीच नाही, मी घरी येऊन रडले; तर आई म्हणाली काय झालं? मी म्हटलं मारलं. तर आई म्हणाली कोणी मारलं तुला? मी म्हटलं, कोणी नाही मीच स्वत:ला मारलं. कदाचित तो माझा पहिला धडा होता की अभिनय हा नेहमी आभासी असतो. कविता म्हणायला आवडायचं मला, ३० पर्यंत पाढे पाठ होते”, अशी आठवण अभिनेत्री लीना भागवत यांनी सांगितली आहे. याबरोबरच लहानपणी मी खूप खोड्या काढायचे, उनाडक्या करायचे, घरी तक्रारी घेऊन यायचे, अशी आठवणदेखील त्यांनी सांगितली आहे.

हेही वाचा: Coldplay Ticket : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा नोटीस; पण हजर झाले दुसरेच अधिकारी!

दरम्यान, ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत त्यांनी शरयूची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना आवडली असल्याचे पाहायला मिळाले. शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेल्या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. लीना भागवत चित्रपट, मालिका, नाटक या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात.

Story img Loader