सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमावर प्रेक्षक अगदी भरभरुन प्रेम करतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने आज प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. आपल्या भन्नाट विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मुळे कार्यक्रमामधील काही विनोदवीरांचं तर नशिबच बदललं. त्यातीलच एक विनोदवीर म्हणजे दत्ता मोरे म्हणजेच सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे.

आणखी वाचा – Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बने व स्नेहल शिदम रिलेशनशिपमध्ये? शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोमुळे चर्चेला उधाण

Raj Babbar daughter knew about his relationship with Smita Patil since she was 7
“ही ती स्त्री आहे जिच्याबरोबर…”, स्मिता पाटील यांच्याबद्दल काय म्हणाली राज बब्बर यांची मुलगी?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Monika Dabade
डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात अभिनेत्री झाली भावुक; ‘ठरलं तर मग’च्या टीमबद्दल म्हणाली, “आतापर्यंत हे माझ्यादेखत…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधील अशिक्षित अधिपतीचं खऱ्या आयुष्यात किती शिक्षण झालंय माहितेय का?
fti former president gajendra chauhan s
“नागपूरने महाराष्ट्राला मुख्यमंत्री दिला, आता पंतप्रधान देणार”, ‘या’ अभिनेत्याच्या वक्तव्याने…

दत्तू या कार्यक्रमामध्ये साकारत असलेली भूमिका अगदी हटके आणि प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहणारी असते. दत्तू या कार्यक्रमामध्ये अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी एक वेगळंच काम करायचा. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या प्रॉडक्शन टीममध्ये दत्तू काम करत होता. त्याला या कार्यक्रमात अभिनेता म्हणून काम करण्याची संधी कशी मिळाली? याबाबत त्याने ‘इट्स मज्जा डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

आणखी वाचा – “आमच्यामध्ये वाद…” नवऱ्याबरोबर राहत नसलेल्या चर्चांवर अमृता खानविलकरचं स्पष्टीकरण

दत्तू म्हणाला, “एका स्किटमध्ये वेटरची एण्ट्री होती. ही भूमिका तू करणार का? असं मला विचारण्यात आलं. मीही तयार झालो. सचिन मोटे सरांनीही मला ही भूमिका करण्यास होकार दिला. सरांचा होकार मिळाल्यानंतर मला खूपच आनंद झाला. वेटरची भूमिका मी त्या एका स्किटसाठी केली.”

आणखी वाचा – Photos : आदिल खानबरोबर प्रेमाची कबुली देताच राखी सावंतने दुबईमध्ये खरेदी केलं होतं महागडं घर, पाहा फोटो

“सरांसह सगळ्यांनाच माझी ही भूमिका आवडली. माझं कौतुकही करण्यात आलं. त्यानंतर माझा या कार्यक्रमातील अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला.” दत्तू ठाण्यामधील वागळे इस्टेट रामनगर परिसरातील चाळीत राहतो. दत्तू राहत असलेल्या चाळीला ‘दत्तू चाळ’ असं नाव देण्यात आलं आहे.

Story img Loader