‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ ही प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी प्रेक्षकांच्या आवडत्या जोड्यांपैकी एक आहे. विशेष म्हणजे ही मालिका सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. स्टार प्रवाहवरील कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मालिका ‘आई कुठे काय करते’, ‘रंग माझा वेगळा’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ यांना मागे टाकतं अजूनही ही ‘ठरलं तर मग’ टीआरपीच्या यादीत पहिल्या स्थानावर टिकून आहे. अशा या बहुचर्चित मालिकेच्या सेटवर रीलसाठी कशी तयारी केली जाते? याचा व्हिडीओ अभिनेत्री जुई गडकरीनं अलीकडेच शेअर केला आहे; जो सध्या तुफान व्हायरल होतं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – ‘ताली’ वेब सीरिज पाहिल्यानंतर गौरी सावंत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”

जुई गडकरी ‘ठरलं तर मग’मध्ये सायली या प्रमुख भूमिकेत आहे. तर अर्जुनच्या भूमिकेत अभिनेता अमित भानुशाली आहे. या दोघांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडतं आहे. दोघं नेहमी नवरा-बायकोचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतात. दरम्यान, जुईनं अलीकडेच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये मालिकेतील कलाकार रील बनवण्यासाठी कशी तयारी करतात? हे दिसत आहेत. या व्हिडीओवर ‘मी सेटवर काय करते?’ आणि ‘माझ्या इतर मैत्रीणी सेटवर काय करतात?’ असं लिहिलं आहे.

हेही वाचा – ‘लोकमान्य’ फेम अभिनेत्री आता ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेत पिंकीच्या भूमिकेत दिसणार

तसेच हा व्हिडीओ शेअर करत जुईनं लिहिलं आहे की, “माझ्या अतिशय प्रामाणिक मैत्रिणी इथे काय करतात ते पाहा. शिवाय प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या मोनिका दबडे हिलाही पाहायला विसरू नका. लवकरच ‘झुमका’ रील येईल, तो तर अजिबात पाहायला विसरू नका.”

हेही वाचा – ‘बाईपण भारी देवा’नंतर सुकन्या मोने दिसणार ‘या’ चित्रपटात; शूटिंगला सुरुवात

दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायलीला त्रास देण्यासाठी प्रियाने नवा डाव रचला आहे. याच डावामध्ये सायली अडकल्याचं पाहायला मिळत आहे.