करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक जण पाहतो, पण सर्वसामान्यांचं हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी सोनी मराठी वाहिनी पुन्हा एकदा घेऊन आली आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या यंदाच्या पर्वामध्ये सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. यावर्षी स्पर्धकांना १ मिस्डकॉल देऊन दोन कोटी रुपये जिंकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
सोनी मराठी वाहिनीवर ‘कोण होणार करोडपती’ हा मराठी रिॲलिटी शो अल्पावधीतच लोकप्रिय ठरला. ‘मनोरंजनासह ज्ञानार्जन’ हे वैशिष्ट्य असणाऱ्या या कार्यक्रमात अवगत असलेलं आणि मिळवलेलं ज्ञान तुम्हाला यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाऊ शकतं, याची प्रचिती मागच्या पर्वांमधून सगळ्यांना आली आहे. या कार्यक्रमामध्ये आलेल्या अनेक स्पर्धकांची स्वप्नपूर्ती झाली आहे.
आणखी वाचा : Video : “शिवानीचं नाव घेतो…” विराजसने वाढदिवशी पत्नीसाठी घेतला खास उखाणा
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन यंदाही प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. यंदा ‘कोण होणार करोडपती’ या मराठी रिॲलिटी शो मध्ये सहभागी होण्याची संधी अनेकांना मिळणार आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी २ मार्चपासून नोंदणी सुरू होते आहे.
यात सहभागी होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्पर्धकांना १४ दिवसांत १४ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. येत्या गुरुवारी म्हणजेच २ मार्चपासून १५ मार्चपर्यंत प्रेक्षकांना दररोज एक प्रश्न विचारला जाणार आहे. असे जवळपास १४ प्रश्न प्रेक्षकांना विचारले जातील. या प्रश्नांची उत्तर ७०३९०७७७७२ या क्रमांकावर मिस्डकॉल देऊन करता येणार आहे. त्याबरोबरच सोनी लिव्ह ॲपवर जाऊन प्रेक्षकांना याची नोंदही करता येईल.
आणखी वाचा : Video : “मला भीती वाटत होती, पण केवळ त्यांच्यामुळे…” वीणा जगतापने सांगितला ‘तो’ किस्सा
यानुसार आता अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार होऊ शकणार आहे. फक्त १ मिस्डकॉल देऊन २ करोड जिंकण्याची संधी यानिमित्ताने प्रेक्षकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम कधीपासून सुरु होणार याबद्दल मात्र अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. यात सहभागी होण्यासाठीची प्रक्रिया २ मार्चपासून सुरू होणार आहे.