‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेनं नुकताच २०० भागांचा टप्पा पार केला आहे. ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. प्रेक्षकांना या मालिकेतील अर्जुन-सायलीची जोडी खूप पसंतीस पडत आहे. नुकत्यात एका एंटरटेन्मेंट मीडियाबरोबर बोलताना अर्जुन म्हणजे अभिनेता अमित भानुशालीनं मालिकेच्या सेटवर सायलीबरोबर झालेल्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मालिकेनं २०० भागांचा प्रवास पूर्ण केल्याच्या निमित्तानं अमित भानुशाली व जुई गडकरी अर्थात अर्जुन-सायली यांनी ‘अल्टा मराठी बझ’शी संवाद साधला. यावेळी त्या दोघांना विचारण्यात आलं, ‘मालिकेच्या सेटवरील कायम लक्षात राहणारी एखादी आठवण काय आहे?’ तेव्हा जुई म्हणाली, “बऱ्याच आठवणी आहेत. आम्ही रोज इतकी धमाल करीत असतो. त्यामुळे आम्हाला सुट्टी असली की, फार चुकल्या चुकल्या सारखं वाटतं. अगदी आजचा दिवस आपण काय करायचं, असं होतं. त्यामुळे एकच अशी आठवण खरंच नाहीये. प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी अविस्मरणीय आहे.”

हेही वाचा – टोमॅटोचे भाव कमी होतील का? महाराष्ट्राला स्थिर सरकार मिळेल का? मराठी अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत

त्यानंतर अमित म्हणाला, “या मालिकेच्या सेटवरील एक दिवस आठवणीत राहण्यासारखा आहे आणि तो म्हणजे पहिला दिवस; जो मी हिला नेहमी सांगतो. आज आम्ही तुम्हाला इतकं चांगलं हसताना-बोलताना दिसतोय; पण पहिला दिवस असा नव्हता. त्या वेळेस सप्टेंबरमध्ये आमचं मॉक शूट होतं. तेव्हा मी मज्जा-मस्ती करीत सेटवर आलो. सगळ्यांना हाय, हॅलो करीत होतो. ही (जुई) तिथे होती. हिचा त्या वेळेस मेकअप झाला होता. त्यामुळे मी तिला ‘हाय’ केलं; तर हिनं मला एकदम शांतपणे ‘हाय’ केलं. त्यापुढे ती काहीच बोलली नाही. हे पाहून मी दोन मिनिटांसाठी थक्क झालो आणि मनातल्या मनात म्हटलं की, मला पूर्ण शो असाच करायचा आहे वाटतं. त्यानंतर मी तिला जाऊन विचारलं की, एवढंच बोलतेस का?” ती म्हणाली, “नाही, मला जरा वेळ लागतो बोलायला. नंतर मला कळलं ही किती बोलते.”

हेही वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने गायली अंगाई, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – “लोकांना मी माजुरडा वाटतो,” असं सोहम बांदेकर का म्हणाला?

दरम्यान, जुई गडकरीची ‘स्टार प्रवाह’वरील ही दुसरी हिट मालिका आहे. यापूर्वी तिची ‘पुढचं पाऊल’ मालिका चांगलीच गाजली होती. तर, अमित भानुशालीनं तब्बल नऊ वर्षांनी ‘ठरलं तर मग’च्या माध्यमातून मालिकाविश्वात पुनरागमन केलं आहे.