‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर झालं. या मालिकेचा गोड शेवट होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर आता या मालिकेचा गोड शेवट काय असणार आहे आणि कधी असणार हे जाहीर करण्यात आलं आहे.
स्टार प्रवाहच्या सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेचा गोड शेवट दाखवण्यात आला आहे. या व्हिडीओत सावित्री बाई आपल्या घरावरील सावित्री निवास ही पाटी काढून मोरे निवास पाटी लावताना दिसत आहेत. त्यानंतर सुरूला घराच्या चाव्या देताना पाहायला मिळत आहे. सावित्री बाई घरात संपूर्ण मोरे कुटुंबीयांना घेऊन नजर उतरवताना दिसत आहेत. मग संपूर्ण मोरे कुटुंब एकत्र चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळत आहे. अशाप्रकारे ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेचा गोड शेवट होणार आहे.
हेही वाचा – अभिनेता प्रियदर्शन जाधवने न्यूज चॅनलमध्ये केलं होतं काम; ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘त्या’ वाक्यांनंतर सोडलं काम
मालिकेचा हा व्हिडीओ शेअर करत स्टार प्रवाहनं लिहिलं आहे की, “ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड… ‘सहकुटुंब सहपरिवार’ कहाणी सफळ संपूर्ण… गुरुवार ३ ऑगस्ट सायंकाळी ६:०० वाजता स्टार प्रवाहवर.”
हेही वाचा – फेक ऑडिशनच्या जाळ्यात अडकली होती मराठमोळी अभिनेत्री; स्वत: खुलासा करत म्हणाली, “आतल्या खोलीत नेलं अन्…”
पण ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेचा हा शेवट पाहून नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवाय मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “हा शेवट कसा असू शकतो? पशा-अंजीचं बाळ कुठे आहे? आम्हाला पुढची कहाणी पाहायची आहे. कृपा करून कहाणी वाढवा, आमच्या आवडत्या मालिकेचा भाग दुसरा लवकर येऊ द्या प्लीज”, तर दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “प्लीज या मालिकेचा दुसरा भाग आणा.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहिलं की, “आम्हाला पशा-अंजीचं बाळ बघायचं आहे.”



हेही वाचा – करण जोहरच्या वेब सीरिजमध्ये झळकणार मराठी मालिकाविश्वातील ‘हा’ लोकप्रिय अभिनेता
दरम्यान, २०२० सालापासून सुरू झालेल्या ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर साडेतीन वर्ष अधिराज्य गाजवलं. अंजी, पशा, सूर्या, सुरू, वैभ्या, अवनी, ओंकार ही पात्र घराघरात पोहोचली. त्यामुळे आता नेटकऱ्यांकडूनही या मालिकेच्या दुसऱ्या भागाची मागणी केली जात आहे.