अभिनेत्री शिवानी रांगोळे आतापर्यंत विविध मालिका, चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. सध्या ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेमध्ये ‘अक्षरा’ ही प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच तिचा वाढदिवस झाला. तर आता तिचा वाढदिवस या मालिकेतील अभिनेता ऋषिकेश शेलार याने त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीबरोबर मिळून साजरा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत ऋषिकेश शेलार ‘अधिपती’ या प्रमुख भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील शिवानी आणि ऋषिकेशच्या कामाचं खूप कौतुक होतं.  या मालिकेच्या निमित्ताने त्या दोघांमध्ये खूप छान मैत्री झाली आहे. तर शिवानीच्या वाढदिवसानिमित्त त्याने तिला एक खास सरप्राईज दिलं.

आणखी वाचा : मास्तरीण बाईंचा खऱ्या आयुष्यातील स्वभाव कसा? अधिपतीने सांगूनच टाकलं, शिवानीच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करत ऋषिकेश म्हणाला…

शिवानीच्या वाढदिवसानिमित्त ऋषिकेशने तिच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली होती. त्या पोस्टमधून त्याने त्यांच्यातील मैत्री कशी आहे हे सांगत शिवानीच्या खऱ्या आयुष्यातला स्वभाव उघडला होता. तर काल ऋषिकेश आणि त्याच्या खऱ्या आयुष्यातील पत्नी स्नेहा शेलार यांनी मिळून शिवानी चा वाढदिवस साजरा केला. त्या दोघांनी तिच्यासाठी एक स्पेशल केक आणला होता. तो कापत शिवानीने त्या दोघांबरोबर तिचा वाढदिवस साजरा केला.

हेही वाचा : ‘असं’ आहे भुवनेश्वरी आणि अक्षरामधील ऑफस्क्रीन नातं! पोस्ट शेअर करत कविता मेढेकर म्हणाल्या, “कितीही वाईट वागले तरीही…”

या दरम्यानचा एक फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत तिने लिहिलं, “लव्ह यू माझ्या वाढदिवसाचं वाढीव सेलिब्रेशन केल्याबद्दल.” तर आता शिवानीने पोस्ट केलेली ही स्टोरी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hrishikesh shelar and his wife celebrate shivani rangole birthday at their home rnv
First published on: 31-10-2023 at 11:39 IST