मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे नेहमीच चर्चेत असते. ‘फुलपाखरू’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ऋताला ओळखले जाते. आपल्या अभिनयाच्या जोरावर ऋताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

गोड व सोज्वळ अभिनेत्री म्हणून ऋताला ओळखले जाते. पण, चित्रपट म्हणले की कलाकारांना बोल्ड सीन्स द्यावे लागतात. काही कलाकार असे सीन्स देतातही आणि काही बोल्ड सीन्स देण्यास नकार देतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांकडून अगदी सहजपणे असे सीन्स दिले जातात. मात्र, मराठी कलाकार जेव्हा बोल्ड सीन देतात तेव्हा त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जाते. नुकतेच ऋताने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चित्रपटातील कलाकारांच्या बोल्ड सीनवर आपले मत व्यक्त केले आहे

Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Hindu Sadhu History
औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित…
chala hawa yeu dya reality show got less trp from last few years
‘चला हवा येऊ द्या’कडे प्रेक्षकांनी का पाठ फिरवली, TRP कमी का झाला? भाऊ कदम म्हणाले, “दुसऱ्या चॅनेलवरच्या कॉमेडी शोमध्ये…”
Geo Studios Stree 2 movie Oscar Entertainment news
जिओ स्टुडिओजला नवी झळाळी…नव्या वर्षात रंजक चित्रपटांसह सज्ज
Vanvaas 1 Days Box Office Collection
‘वनवास’ची निराशाजनक सुरुवात, नाना पाटेकरांच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले फक्त ‘इतके’ लाख
Actor Subodh Bhave expressed his anger that Marathi movie are not getting screens
“आपल्याच राज्यात आपल्याला भीक मागवी लागतेय”, सुबोध भावे असं का म्हणाला? जाणून घ्या…
Atul Kulkarni
अभिनेते अतुल कुलकर्णी १० वर्षांपासून मराठी सिनेमांपासून लांब का? म्हणाले, “माझ्या हातातून…”
Savlyachi Janu Savli
“महालक्ष्मीचं व्रत केलं ना…”, मेहेंदळे कुटुंबावरील संकट दूर करण्यासाठी सावली काय करणार? पाहा ‘सावळ्याची जणू सावली’चा प्रोमो

हेही वाचा- नववधू पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण निघाले हनिमूनला, व्हिडीओ व्हायरल

ऋता म्हणाली, “लोकांचा विचार करून मी कधीच निर्णय घेत नाही. मला तशी गरज वाटली नाही. पण, जेव्हा असं काही असेल तेव्हा मी विचारते की ‘हे गरजेचं आहे का? गरज आहे का? हे गाळलं तर चालेल का? हे मी स्पष्ट विचारते.”

ऋता दुर्गुळेच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत तिने सुपरहिट मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. शुक्रवारी (ता. ८) ऋताचा ‘कन्नी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लरी विराज व ऋषी मनोहर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Story img Loader