Bigg Boss Marathi 5 मध्ये प्रत्येक स्पर्धकांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. यामध्ये उपविजेता ठरलेला अभिजीत सावंतला जेंटलमन असे म्हटले जाऊ लागले. अभिजीत सावंतने त्याच्या या खेळाने आणि वागण्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता घराबाहेर गेल्यानंतर तो सातत्याने चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडीओ लक्ष वेधून घेत आहे.
“मी तिचा मोठा चाहता आहे”
अभिजीत सावंतने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतो, “फुलवंतीच्या प्रिमिअरला मला मंगेश यांनी आवर्जून बोलवलं आहे. ते माझे मित्र आहेत. त्यासाठी चाललोय. प्राजक्ता माळीला बघायला मिळेल. मी तिचा मोठा चाहता आहे”, असे त्याने या व्हिडीओमध्ये म्हटले. त्यानंतर पुढे त्याच्या व्हिडीओमध्ये कार्यक्रमाच्या ठिकाणी तो फोटोंसाठी पोझ देताना दिसत आहे. या सोहळ्यात तो अनुषा दांडेकरलादेखील भेटल्याचे दिसत आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना त्याने, “फुलवंती हा एक खूपच अप्रतिम चित्रपट आपल्या भेटीला आलाय. त्याच्या प्रिमिअरचे काही क्षण”, असे कॅप्शन दिली आहे. याबरोबरच, फुलवंतीच्या टॅग करत खूप खूप शुभेच्छा असे लिहिले आहे.
प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्नेहल तरडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.
हेही वाचा: ५७ व्या वर्षी दुसरं लग्न करावं का वाटलं? सिद्धार्थ चांदेकरच्या आई म्हणाल्या, “हा निर्णय घ्यायला…”
अभिजीत सावंतने बिग बॉस मराठीच्या ५च्या घरात उत्तम खेळ खेळत प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली. निक्की तांबोळीबरोबरची त्याची मैत्री विशेष गाजली. त्यांच्यातील निखळ मैत्री प्रेक्षकांना आवडत असल्याचे सोशल मीडियावर दिसत होते. बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता तो होईल, असेदेखील म्हटले जात होते. मात्र त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सूरज चव्हाण या पर्वाचा विजेता ठरला. तिसऱ्या स्थानावर निक्की तांबोळी होती. तर चौथ्या स्थानावर धनंजय पोवारला समाधान मानावे लागले. पाचव्या स्थानावरून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर बाहेर पडली. तर सहाव्या स्थानावर जान्हवी किल्लेकर होती. तीने ९ लाख रुपये घेण्याचा निर्णय घेतला. त्याची मोठी चर्चादेखील झाल्याचे पाहायला मिलाले.
दरम्यान, आता अभिजीत सावंत कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.