काही महिन्यांपूर्वी टेलिव्हिजनवर ‘सन मराठी’ ही नवी वाहिनी सुरु झाली. फार कमी कालावधीमध्ये या वाहिनीवरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या वाहिनीवरील ‘माझी माणसं’ ही मालिका सध्या खूप चर्चेत आहे. अभिनेता विश्वनाथ कुलकर्णीला या मालिकेमुळे फार प्रसिद्धी मिळाली. ‘माझी माणसं’मध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दरम्यान एका मुलाखतीमध्ये विश्वनाथने त्याच्या प्रवासाबद्दल खुलासा केला.

इ-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “माझे वडील शेतकरी आहे. त्यांनी ८ लाख रुपये खर्च करुन मला एका प्रतिष्ठीत महाविद्यालयामध्ये घातले. मी एमसीएचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर मी अभिनय क्षेत्राकडे वळण्याचा निर्णय घेतला. माझ्या या निर्णयाचे माझ्या आई-वडिलांनी स्वागत केले. त्यांच्या पाठिंब्याशिवाय इथवर पोहचणं मला शक्य नव्हते. नाटकांपासून मी माझ्या कारकीर्दीची सुरुवात केली.”

Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
ajit pawar baramati assembly election
Ajit Pawar: “मी पेताड, गंजेडी असतो तर ठीक आहे, पण…”, अजित पवारांनी प्रतिभाताई पवारांचा भाषणात केला उल्लेख; म्हणाले…
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Vikrant Massey family religion variety
“माझे ख्रिश्चन वडील ६ वेळा वैष्णोदेवीला गेले, तर मुस्लीम भाऊ…”; बॉलीवूड अभिनेत्याचा कुटुंबाबद्दल खुलासा
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

आणखी वाचा – आधी आई गेली अन् १४ दिवसांनी बाबाही… ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ वेदनादायी प्रसंग

तो पुढे म्हणाला, “सुरुवातीला मी अनेक नाट्यशिबिरांमध्ये भाग घेतला होता. हळूहळू मी मालिका, चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम करण्यासाठी ऑडिशन्स द्यायला लागलो. मी ‘मन उडू उडू झालंय’ या मालिकेतील इंद्रजीत या पात्रासाठी ऑडिशन दिली होती. पण मला तेथे संधी मिळाली नाही. अनेक ठिकाणी माझ्या वर्णामुळे लोकांनी मला काम देणे टाळले. आत्तापर्यंत मी १६ मालिका आणि काही वेब सीरिजमध्ये काम केले आहे. हा अनुभव असूनही मला नकाराचा सामना करावा लागत आहे. “

आणखी वाचा – “…म्हणून मी गेली अनेक वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर राहिले”; मलायका अरोराने सांगितलं कारण

विश्वनाथ अजय देवगनच्या ‘रुद्रा’ या वेब सीरिजमध्ये झळकला आहे. अजयसह काम करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना त्याने “मी त्या सीरिजमध्ये सहाय्यक पात्र साकारले होते. तेव्हा सेटवर अजय सर माझ्याशी गप्पा मारायचे, त्याच्याकडून मला काम करत राहायची प्रेरणा मिळायची. इतका मोठा सेलिब्रिटी माझ्यासारख्या एका सहाय्यक पात्र साकारणाऱ्या अभिनेत्याशी इतक्या मनमोकळेपणाने गप्पा मारतोय याचे मला खूप नवल वाटले होते”, असे वक्तव्य केले.