गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नेहमी चर्चेत असते. मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे जितकी चर्चेत असते तितकीच ती आता कवितेमुळे देखील चर्चेत असते. अशी लोकप्रिय आणि चर्चेत असणारी मधुराणी जर अभिनेत्री नसती तर कोण असती? याविषयी तिने स्वतः खुलासा केला आहे.

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने काही दिवसांपूर्वी ‘बिंगेपॉडस मराठी’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी मधुराणी हिने वैयक्तिक जीवनाबाबत अनेक खुलासे केले. यादरम्यान तिला विचारलं गेलं की, मधुराणी आज जे तू करते आहेस ते तू करत नसतीस तर तू आज काय करत असतीस? यावर मधुराणी म्हणाली, “अवघड आहे. कारण मला लहानपणापासूनचं अभिनय करायचा होता. दुसरा विचारच केला नाही. पण मला असं वाटतं की, मी कुठल्या तरी विषयातली प्रोफेसर असते. मला शिकवायला आवडतं. पुण्यात सगळ्यांनाच शिकवायला आवडतं. अक्कल शिकवायला तर खूपचं आवडते. त्यामुळे पुण्यात सगळेच शिक्षक असतात. जोक सपाट. पण मला कुठल्याही विषयाच्या खोलात जाऊन समजून घ्यायला आणि आपल्याला जे समजलंय ते लोकांना सांगायला आवडतं.”

हेही वाचा – निळू फुलेंच्या लेकीची स्टार प्रवाहच्या ‘या’ लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री; पाहा व्हिडीओ

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Marathi Actress Vishakha Subhedar wrote a special post for son abhinay subhedar birthday
अभिनेत्री विशाखा सुभेदारने लेकाच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली खास पोस्ट, म्हणाली, “जे शिकायला परदेशी गेलायस…”
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
paaru serial zee marathi shweta kharat entry
‘पारू’ मालिकेत होणार लोकप्रिय अभिनेत्रीची एन्ट्री! साकारणार खलनायिका, तुम्ही ओळखलंत का? पाहा प्रोमो
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
marathi actress amruta Deshmukh share brother abhishek Deshmukh funny video
‘आई कुठे काय करते’मधील अभिषेक देशमुखचा बहिणीने शेअर केला मजेशीर व्हिडीओ, म्हणाली, “मालिका संपतेय तर मग…”

त्यानंतर अभिनेत्रीला विचारलं, “सध्या कोणत्या विषयाचा खोलात जाऊन अभ्यास चाललाय?” या प्रश्नाचं उत्तर देत मधुराणी म्हणाली, “मी सध्या पर्व वाचतेय, भैरप्पा. मला नेहमी महाभारत खूपच आकर्षित करतं. आता हे पर्व हातात घेतलंय. मध्यंतरी मी रॅडिकल अवेकेनिंग (Radical Awakening) डॉ. शेफाली यांचं वाचत होते. मला आध्यात्मिक विषयावर वाचायला आवडतं. मी मानसशास्त्रज्ञ सुद्धा झाली असते. कारण मला कॉलेजमध्ये मानसशास्त्र विषय होता. अभिनयाचा भाग म्हणून मी मानसशास्त्र विषय घेतला होता. कारण मनाचा अभ्यास केला तर भूमिका समजायला सोपी पडेल. पण मन हा विषय बघायला गेलं तर अफाट, अथांग आणि अनाकलनीय आहे. पण मला आवडतं. माझ्यामध्ये ती करुणा आहे. दुसऱ्याला समजून घेण्याची, असं मला वाटतं. त्यामुळे मी जर अभिनेत्री झाले नसते तर मानसशास्त्रज्ञ झाली असते.”