‘इमली’ फेम सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वोहरा जुळ्या मुलांचा बाबा झाला आहे. करणची पत्नी बेलाने जुळ्या मुलांना जन्म दिला आहे. अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मुलांच्या जन्माबद्दल माहिती दिली. करण व त्याची पत्नी बेला लग्नाच्या ११ वर्षांनी आई-बाबा झाले आहेत.
हेही वाचा- अभिनेत्री अमीषा पटेलने चेहरा झाकून कोर्टात लावली हजेरी, नेमकं प्रकरण काय?
करण ‘इमली’ मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे. करण बाबा झाला आहे, पण तो पत्नी व मुलांपासून दूर आहे. करण सध्या मुंबईत मालिकेच्या शूटिंमध्ये व्यग्र आहे. तर, त्याची पत्नी बेला सध्या दिल्लीत तिच्या माहेरी आहे. करण तिला लवकरच मुंबईला बोलावण्याचा विचार करत आहे.
करणने काही दिवसांपूर्वीच बेबी शॉवरचे फोटो शेअर केले होते. त्यांच्या बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीच कलरच्या गाऊनमध्ये बेला खूपच सुंदर दिसत होती. दरम्यान बेलाने गुडन्यूज दिल्यानंतर चाहते त्या दोघांना शुभेच्छा देत आहेत.
Karan Vohra becomes father
‘ई-टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला, “मुलांपासून दूर राहणे खूप कठीण आहे. मी गरोदरपणातही बेलासोबत राहू शकलो नाही आणि याचं मला खूप दुःख आहे. आम्ही दोघे नेहमी व्हिडीओ कॉलवर कनेक्ट होतो. पण मी तिच्यासोबत वेळ घालवू शकतो नाही.”