बॉलिवूडमधील अभिनेते आणि त्यांच्या पत्नी कायमच चर्चेत असतात. मुलाखतीच्या निमित्ताने अथवा एखाद्या कार्यक्रमात बॉलिवूडमधील जोडपीहजेरी लावत असतात. अभिनेता गोविंदा त्याची पत्नी सुनीता सध्या चर्चेत आहेत. हे दोघे नुकतेच इंडियन आयडॉल १३ मध्ये पहिल्यांदा थिरकताना दिसले आहेत. आजवर गोविंदा अनेक अभिनेत्रींनबरोबर नाचताना दिसला आहे. मात्र यावेळी तो पहिल्यांदा आपल्या पत्नीबरोबर थिरकताना दिसत आहे. या कार्यक्रमात त्यांची मुलेदेखील उपस्थित होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे दोघे याआधी कपिल शर्माच्या कार्यक्रमात एकत्र दिसले होते. कपिल शर्माच्या कार्यक्रमात अनेक गंमतीजमती होत असतात. याच कार्यक्रमात कपिलने दोघांना आपल्या खासगी आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. तसेच दोघे एकमेकांना किती ओळखतात यासाठी कपिलने काही प्रश्न विचारले मात्र गोविंदाला उत्तर देता आली नाहीत. कपिलने विचारले की सुनीता मॅडमनी कोणते कानातले घातले आहेत? कोणते नेलपेंट लावले आहे? यातील कोणत्याच प्रश्नाला गोविंदा उत्तर देता आले नाही, कपिलला मध्येच थांबवत सुनीता म्हणाली ‘कपिल तू कोणाला प्रश्न विचारत आहेस, याने कोणती अंतर्वस्त्र घातली आहेत ते सुद्धा मी सांगू शकते’. सुनीताचे हे उत्तर ऐकताच कपिलसह प्रेक्षकदेखील हसायला लागले.

मनीष मल्होत्राच्या पार्टीत अनन्या-सुहाना दिसल्या एकत्र, नेटकरी म्हणाले, “दोघींच्या वडिलांनी…”

गोविंदा, सुनीताने ११ मार्च १९८७ रोजी एका मंदिरात लग्न केले होते. त्यांनी ४ वर्ष लग्न गुपित ठेवले होते. दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. गेल्या ३६ वर्षांपासून ते एकत्र आहेत. टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. दोघे एकमेकांचे आधारस्तंभ आहेत.

या अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा, करायचं होतं लग्न पण…

गोविंदाने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. अभिनयाच्या बरोबरीने आपल्या नृत्यातून त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. गोविंदा मूळचा विरारचा आहे. बॉलिवूडमध्ये त्यानेदेखील अनेकवर्ष संघर्ष केला आहे. अभियानाच्या बरोबरीने गोविंदा राजकरणातदेखील सक्रिय होता. २००४ साली काँग्रेस पक्षाने लोकसभेसाठी त्याला उमेदवार म्हणून निवडले होते. गोविंदा निवडूनदेखील आला होता.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In kapil sharma show govinda wife sunita confessed that she know what undergarment govinda wear spg