‘इंडियन आयडल’च्या १३ व्या पर्वाचा ग्रँड फिनाले रविवारी २ एप्रिल रोजी पार पडला. ऋषी सिंह या पर्वाचा विजेता ठरला. पण, विजेता ऋषी सिंह त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलाच चर्चेत आहे. ऋषी त्याच्या पालकांचा दत्तक मुलगा आहे. महत्त्वाचं म्हणजे या शोमधेच त्याला कळालं की पालकांनी त्याला दत्तक घेतलं होतं.
मृणाल ठाकूरचे बिकिनीतील फोटो पाहून संतापले नेटकरी; म्हणाले, “फॉलोअर्स वाढवण्यासाठी…”
अयोध्येतील रहिवासी असलेल्या ऋषीने कधीही गाण्याचे प्रशिक्षण घेतले नाही. तो मंदिरं आणि गुरुद्वारांमध्ये गात असे. शो दरम्यान त्याने त्याच्या आयुष्याशी संबंधित अनेक खुलासे केले. त्याला दत्तक घेतल्याचेही शोमध्ये उघड झाले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ऋषीलाही ही गोष्ट तेव्हाच कळली होती.
दत्तक घेण्याबद्दल ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना ऋषी म्हणाला, “माझ्यासाठी ही मोठी बातमी होती आणि मला धक्का बसला. मला वाटतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आयुष्यातील हे वास्तव स्वीकारलं. माझ्या आई-वडिलांसोबत आनंदी जीवन जगण्याचा हा एकमेव मार्ग होता. मला वाटते की आमच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना सत्य स्वीकारण्याचे धैर्य मिळेल.”
दरम्यान, “माझं स्वप्न पूर्ण झालं आहे. जेव्हा माझं नाव विजेता म्हणून घोषित करण्यात आलं, तेव्हा माझा विश्वासच बसत नव्हता. या महत्त्वाच्या शोचा वारसा पुढे नेणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी चॅनल, जज आणि इंडियन आयडॉलच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे,” असं ऋषी शो जिंकल्यानंतर म्हणाला होता.