‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं ऐकताच क्षणी आपल्या डोळ्यासमोर लोकप्रिय गायक अभिजीत सावंतचे नाव येते. या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले होते. या गाण्यामुळे प्रसिद्धीझोतात आलेला अभिजीत सावंत आजही अनेकांच्या लक्षात आहे. ‘इंडियन आयडल’ चा पहिला विजेता म्हणून त्याला ओळखले जाते. नुकतंच त्याने एका फजितीचा किस्सा सांगितला आहे.

अभिजीत सावंत हा सोशल मीडियावर सक्रीय असतो. नुकतंच त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला “तुझी कधी फजिती झाली आहे का?” असा प्रश्न विचारण्यात आला.
आणखी वाचा : “मतांची फेरफार, पैशांची देवाण अन्…” ‘इंडियन आयडल’ विजेता अभिजीत सावंतचा ‘त्या’ अफवेबद्दल खुलासा, म्हणाला “माझी परिस्थिती…”

Kiran Mane
“डोळ्यात पाणी आलं…”, किरण माने यांनी सांगितली ‘ती’ आठवण; म्हणाले, “माझ्यासारख्या मराठी अभिनेत्याला…”
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Advait kadne
‘नवरी मिळे हिटलरला’ फेम अद्वैत कडणेने शेअर केला ‘मन्या’च्या लूकमधील फोटो; आशुतोष गोखले, अपूर्वा गोरेसह कलाकारांकडून कमेंट्सचा पाऊस
mrunal thakur marathi film sangeet manapman review
सुबोध भावेच्या ‘संगीत मानापमान’ सिनेमासाठी अभिनेत्री मृणाल ठाकूरची पोस्ट, म्हणाली…
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी

“माझ्या आयुष्यात कार्यक्रमावेळी अनेक घटना घडल्या आहेत. माझी अनेकदा फजितीही झाली आहे. मी एकदा स्टेजवर पडलो होतो. जेव्हा स्टेजवर मी एंट्री घेत होतो, तेव्हा चमकी आणि धूर करण्यात आला होता. त्यांनी या कार्यक्रमावेळी स्टेजवर धूर करण्यात आल्याने तिथे असलेली फरशी ओली झाली होती.

त्यावेळी मी एंट्री घेतली आणि मी घसरलो. मी तेव्हा सुपरमॅन झाल्यासारखंच मला वाटलं. त्यावेळी माझी फजिती झाली होती. पण कलाकारांच्या आयुष्यात फजिती होणं हे अनेकदा होत असतं. त्यामुळे कलाकाराने झालेली फजिती सहन करण्याची आणि ते विसरण्याची सवय लावायला हवी”, असे अभिजीत सावंतने म्हटले.

आणखी वाचा : “पुरूषांची जात…”, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट, म्हणाली…

दरम्यान अभिजीतने इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असल्याचे पाहायला मिळते.

Story img Loader