छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणजे ‘इंडियन आयडल.’ आजवर या स्पर्धेत सहभागी झालेल्या अनेक गायकांचे आयुष्य पूर्णपणे बदललं आहे. इंडियन आयडलचे पहिले पर्व मराठमोळा गायक अभिजीत सावंतने जिंकले होते. यानंतर अभिजीतचे आयुष्य रातोरात बदलले. मात्र नुकतंच अभिजीतनेत त्याच्याबद्दल पसरवण्यात आलेल्या वाईट अफवेबद्दल भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिजीत सावंत हा ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमामुळे प्रसिद्धीझोतात आला. नुकतंच त्याने एका युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला तुझ्याबद्दल पसरवण्यात आलेली सर्वात वाईट अफवा कोणती, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने उत्तर दिले.
आणखी वाचा : “त्यांनी वडा खाल्ला आणि…” ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांच्या निधनानंतर प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला…

“मी माझ्याबद्दल अनेक अफवा ऐकल्या आहेत. मला आता नक्की आठवत नाही. मी जेव्हा इंडियन आयडॉल जिंकले तेव्हा अनेकांनी माझ्याबद्दल विविध अफवा पसरवल्या होत्या. मी पैसे देऊन हा शो जिंकला, असेही बोललं जातं होतं.

त्यावेळी माझ्या घरची परिस्थिती अशी होती की काही काम करायलाही पैसे नसायचे. पण तेव्हा काही लोकांनी अभिजीत सावंतकडे खूप पैसे होते. त्याने मतांची फेरफार केली आणि तो ही स्पर्धा जिंकला, अशी अफवा पसरवली होती. हे माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट अफवा होती”, असे अभिजीतने सांगितले.

आणखी वाचा : “पुरूषांची जात…”, मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याप्रकरणी सोनाली कुलकर्णीची संतप्त पोस्ट, म्हणाली…

दरम्यान अभिजीतने इंडियन आयडलचे पहिले पर्व जिंकल्यानंतर त्याला अनेक गाण्यांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यानंतर त्याला काम मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. सध्या तो लाइमलाइटपासून दूर असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian idol first season winner abhijeet sawant talk about rumors after winning competition with help of money nrp