‘संगीत सम्राट’, ‘राइझिंग स्टार’, ‘सूर नवा ध्यास नवा’, ‘इंडियन आयडल मराठी’ आणि ‘सुपरस्टार सिंगर’ या कार्यक्रमानंतर सध्या आळंदीचा चैतन्य देवढे ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व गाजवतं आहे. १८ वर्षांच्या चैतन्य देवढेने आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. ‘इंडियन आयडल’च्या १५व्या पर्वाचे परीक्षक विशाल ददलानी, श्रेया घोषाल आणि बादशाह देखील त्याच्या आवाजाचे चाहते झाले आहेत. ‘इंडियन आयलड’च्या या पर्वात चैतन्यने कधी आपल्या आवाजाने परीक्षकांच्या डोळ्यात पाणी आणलं तर कधी स्टँडिंग ओव्हेशन द्यायला भाग पाडलं. सध्या चैतन्यच्या एका व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘सोनी लिव्ह इंडिया’च्या इन्स्टाग्राम पेजवर चैतन्य देवढेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर ‘वनवास’ या त्यांच्या नव्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी ‘इंडियन आयडल’च्या १५व्या पर्वात हजर राहिल्याचं पाहायला मिळत आहे. यावेळी चैतन्य त्यांच्यासमोर अशी काही एक कृती करतो, ज्यामुळे नाना पाटेकर हातचं जोडतात.

हेही वाचा – Video: “कसे आहात पुणेकर?” दिलजीत दोसांझने कॉन्सर्टमध्ये मराठीत साधला संवाद, म्हणाला, “मुलगी शिकली…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला नाना पाटेकरांचं सर्वजण स्वागत करताना दिसत आहे. यावेळी आदित्य नारायण त्यांच्या पाया पडताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर नाना पाटेकर म्हणतात, “चला सुरू करा.” मग चैतन्य नाना पाटेकरांना म्हणतो की, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. तेव्हा नाना पाटेकर मजेत म्हणतात, “हा…मला हवा येत आहे.” त्यानंतर चैतन्य म्हणतो, “थोडी मिमिक्री करण्याचा प्रयत्न करतो.” नाना म्हणतात, “हा…चालेल, करना.”

पुढे चैतन्य नाना पाटेकरांची हुबेहूब मिमिक्री करतो. हे पाहून श्रेया घोषालसह सर्वजण आश्चर्य चकीत होतात. त्यानंतर नाना पाटेकर हात जोडून मजेत म्हणतात, “अभिनय क्षेत्रात येऊ नकोस. आम्हाला आमचं पोट भरायचं आहे.” तेव्हा कार्यक्रमात एकच हशा पिकतो. सध्या चैतन्य आणि नाना पाटेकरांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Video: “ही माझी साथी, सवंगडी…”, सई ताम्हणकरने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील लाडक्या व्यक्तीबद्दल केला खुलासा

हेही वाचा – ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री झळकणार नव्या चित्रपटात, पोस्ट करत म्हणाली, “तुमच्या आशीर्वादाची गरज…”

दरम्यान, चैतन्य देवढेबद्दल बोलायचं झालं तर लोकप्रिय दिग्दर्शक संजय जाधव यांनी मराठी सिनेसृष्टीत चैतन्यला लाँच केलं. त्यांच्या ‘लकी’ चित्रपटात चैतन्यला गाण्याची संधी दिली. ‘लकी’ चित्रपटातील ‘माझ्या दिलाचो’ गाणं चैतन्य देवढेने गायलं. त्याचं हे गाणं सुपरहिट ठरलं. आता चैतन्य ‘इंडियन आयडल’चं १५वं पर्व गाजवतं आहे.