समय रैनाचा वादग्रस्त कार्यक्रम ‘इंडियाज गॉट लेटेंट’ ( India’s Got Latent ) प्रकरणी महाराष्ट्र सायबर सेलने राखी सावंतला ( Rakhi Sawant ) समन्स बजावला आहे. २७ फेब्रुवारीला तिला जबाब नोंदवण्यासाठी महाराष्ट्र सायबर सेलच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सध्या राखी सावंत चर्चेत आली आहे. महाराष्ट्र सायबर सेलने समन्स बजावल्यानंतर राखी सावंतची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत म्हणाली, “मला समन्स बजावण्यात काहीही अर्थ नाहीये. तुम्ही मला व्हिडीओ कॉल करा, मी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहे. मी एक कलाकार आहे. मला पैसे देऊन बोलावलं होतं. मी माझं काम केलं. मी कोणाला शिव्या पण दिल्या नाहीत. त्यामुळे मला समन्स बजावण्यात काही अर्थ नाही.”

पुढे राखी सावंत म्हणाली की, प्रलंबित बलात्कार प्रकरणारकडे लक्ष द्या, त्याचा सोक्षमोक्ष लावा. मी गरीब आहे. माझ्याकडे एकही रुपया नाही, जे तुम्हाला देऊ शकेन. खरं सांगते. मी दुबईत राहतेय. माझ्याकडे काहीही कामं नाहीत. मी पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे मला बोलावून तुम्ही काय करणार आहात? काहीच फायदा नाही. रोज मुलींवर बलात्कार होतायत. त्याकडे लक्ष द्या. त्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्या, ही माझी विनंती आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मी व्हाइट कॉलर आहे.

दरम्यान, समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या कार्यक्रमाचे सर्व भाग युट्यूबवरून डिलीट करण्यात आले आहेत. रणवीर अलाहाबादियाच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर समय रैनाने हा मोठा निर्णय घेतला. ‘इंडियाज गॉट लेटेंट’मध्ये रणवीरने एका स्पर्धकाला विचारलं होतं की, तुला आयुष्यभर तुझ्या आई-वडिलांना सेक्स करताना पाहायला आवडेल? की तुला त्यांच्यात सामील होऊन ते थांबवायला आवडेल? रणवीरच्या या वक्तव्यावरून गदारोळ झाली. अजूनही या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

Story img Loader