‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेतील बालकलाकार सांची भोईरने साकारलेली इंदू प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. एक निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ आणि तितकीच विचारी असणारी इंद्रायणी आता घराघरात पोहोचली आहे. तसंच अभिनेत्री अनिता दाते, संदीप पाठक, स्वानंद बर्वे हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेचं लेखन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक अभिनेता चिन्मय मांडलेकर करत आहे. सध्या मालिकेचं शूटिंग नाशिकच्या कडाक्याच्या थंडीत सुरू आहे. याचा अनुभव सांची भोईरने सांगितला आहे.

सध्या वातावरण थोडं थंडावल्यामुळे सर्वजण सुखावले आहेत. या गुलाबी थंडीचा अनुभव घेण्यात सर्वजण दंग आहेत. ‘कलर्स मराठी’वरील ‘इंद्रायणी’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरदेखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय. नाशिकमध्ये कडाक्याच्या थंडीत मालिकेचं चित्रीकरण सुरू आहे. नुकत्याच पार पडलेल्या महाएपिसोडनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे या महाएपिसोडचंही रात्रीच्या गारेगार थंडीत चित्रीकरण पार पडलं होतं. थंडगार वातावरणात गरम चहा आणि शेकोटी करत शूटिंग करण्यात आलं आहे.

हेही वाचा – Year Ender 2024: यंदा बॉलीवूडच्या कोण-कोणत्या सेलिब्रिटींच्या घरी पाळणा हलला, जाणून घ्या…

नाशिकमधील थंडीत शूटिंग करण्याच्या अनुभवाबद्दल बोलताना अनिता दाते म्हणाली, “इंद्रायणी’ मालिकेचा नुकताच महाएपिसोड पार पडला आहे. त्या महाएपिसोडचं आम्ही गेलं आठवडाभर शूट करत होतो. आम्ही नाशिकमध्ये मालिकेचं शूटिंग करत असून सगळीकडे प्रचंड धुकं पडलेलं आहे. जवळजवळ ११ डिग्री तापमान आहे. पहाटे पहाटे ते आणखी कमी होत जातं. मोठ्यांसह सेटवरील लहान मुलंदेखील थंडी एन्जॉय करत काम करत आहेत. स्वेटर, शाली या गोष्टींच्या सहाय्याने आम्ही मोठ्या-मोठ्या सीनचं शूटिंग करत आहोत. बऱ्याचदा आमच्या कॉस्च्युममुळे स्वेटरही घालता येत नाही. तरीसुद्धा सगळे नाशकातील थंडी एन्जॉय करत खूप उत्साहाने काम करत आहेत. त्यामुळे खूप मजा येते.”

हेही वाचा – “मला तुझी सासू असल्याचा खूप अभिमान…”, अंकिता लोखंडेला वाढदिवसानिमित्ताने सासूबाईकडून मिळालं खास गिफ्ट, म्हणाल्या…

इंद्रायणी मालिका ( फोटो सौजन्य - ग्राफिक्स टीम )
इंद्रायणी मालिका ( फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम )

हेही वाचा – Video: “बाई हा काय प्रकार”, ‘बिग बॉस मराठी’ फेम योगिता चव्हाणचा डान्स पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया, म्हणाले…

‘इंद्रायणी’ मालिकेत इंदूची भूमिका साकारणारी सांची भोईर म्हणाली,”महाएपिसोडचं आम्ही शूट केलं त्यादिवशी खूप थंडी होती. सेटवरची सर्वच मंडळी कुडकुडत होते. माझा कीर्तनाचा वेगळा ड्रेस असल्याने स्वेटरवर घालता आलं नाही. पण सीन कट होताच पळत जाऊन मी स्वेटर घातलं. या सगळ्यात एक वेगळीच गंमत होती. शूटिंगदरम्यान आम्ही सेटवर शेकोटीदेखील केली. थंडीमुळे दातखीळ, तोंडातून वाफ निघणे हे प्रकार घडत होते. एकंदरीतच खूप मजा करत आम्ही शूटिंग पूर्ण केलं आहे.”