मराठीमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. अभिनयाबरोबरच प्राजक्ताला फिटनेसचं प्रचंड वेड आहे. कामात कितीही व्यग्र असली तरी ती तिच्या फिटनेसकडे पुरेपुर लक्ष देताना दिसते. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओ देखील ती इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअरही करते. आता देखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये चक्क एकाच वेळी १०८ सुर्यनमस्कार करताना प्राजक्ता दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

योगा आणि प्राणायम हा प्राजक्ताचा आवडीचा विषय आहे. तिच्या दिवसाची सुरुवातच व्यायामाने होते. प्राजक्ताच्या व्यायामामध्ये सुर्यनमस्कारचाही समावेश असतो. आज जागतिक योग दिन आहे. याचनिमित्ताने प्राजक्ताने एक चांगला उपक्रम हाती घेतला. तिने एकाचवेळी १०८ सुर्यनमस्कार केले.

आणखी वाचा – “भसाड्या आवाजात…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील अभिनेत्रीसाठी समीर चौघुलेंची पोस्ट, म्हणाले, “इंजिनीयरिंगची पदवी मिळवली अन्…”

शिवाय १०८ सुर्यनमस्कार करतानाचा व्हिडीओही तिने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला. तसेच प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत व्यायाम करताना कशाप्रकारे काळजी घ्यावी हेही सांगितलं आहे. एसी सुरु ठेवून व्यायाम करणं टाळा असंही तिने या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितलं. शिवाय सुर्यनमस्कार केले याचा व्हिडीओच्या माध्यमातून पुरावा देत आहे असंही प्राजक्ताने म्हटलं.

आणखी वाचा – Video : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेचा राहत्या चाळीतील ‘तो’ व्हिडीओ चर्चेत, नेटकरी म्हणतात, “तुझीही वेळ येईल आणि…”

प्राजक्ता म्हणाली, “सालाबादप्रमाणे यंदाही १०८ सुर्यनमस्कार घातले. हा घ्या पुरावा. योगदिनाच्या फक्त तोंडी शुभेच्छा दिल्या नाही”. प्राजक्ताच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. दरवर्षी प्राजक्ता योद दिनानिमित्त १०८ सुर्यनमस्कार करते. शिवाय यादरम्यानचा व्हिडीओही शेअर करताना दिसते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internation yoga day 2023 prajakta mali 108 suryanamaskar video goes viral on social media see details kmd