मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आज जागतिक पुरुष दिन आहे. यानिमित्ताने प्रसादने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्रसादने समस्त पुरुष वर्गाला शुभेच्छा देण्याकरिता शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
प्रसादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो. नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो आयपॅडवर काहतरी बघताना दिसत आहे. एवढ्यातच “बेबी मेकअपला हिंदीमध्ये काय म्हणतात?” असं मुलीच्या आवाजातील वाक्य ऐकू येत आहे. त्यानंतर प्रसाद उत्तर देत “धोका” असं म्हणत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओला प्रसादने “ज्यांनी ज्यांनी हा ‘धोका’ खाल्ला आहे
त्या समस्त पुरुष वर्गाला ‘जागतिक पुरुष दिना’च्या शुभेच्छा”, असं कॅप्शन दिलं आहे.
हेही वाचा >> “आपके बाप का…” अनुपम खेर यांनी सांगितला किशोर कुमार यांच्याबरोबर घडलेला ‘तो’ किस्सा
प्रसादच्या या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना प्रसादची पत्नी मंजिरी ओकची आठवण झाल्याचं दिसत आहे. प्रसादच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी मंजिरी नाव घेत कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत “मंजिरी ताईने अजून वाचलं नाही वाटतं”, अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्याने “मंजिरी ताई कुठे आहात तुम्ही”, असं कमेंटमध्ये म्हटलं आहे. “मंजिरी खूप सुंदर आहे. तिला मेकअपची गरज नाही”, अशी कमेंट केली आहे.
हेही वाचा >> “मला टकला मुलगा नवरा म्हणून…” अपूर्वा नेमळेकरने बिग बॉसच्या घरात केलेलं वक्तव्य चर्चेत
प्रसाद नेहमीच हटके फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतो. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.