सध्या देशभरात IPL च्या १७ व्या हंगामाची जोरदार चर्चा चालू आहे. मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या मोसमात आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. सलग तीन पराभव, हार्दिक पंड्याकडे देण्यात आलेली कर्णधारपदाची जबाबदारी या सगळ्या गोष्टींमुळे सध्या मुंबईकरांमध्ये काहीसा नाराजीचा सूर उमटला आहे. परंतु, या सगळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ पाहून सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
मुंबईकरांच्या आनंदाचं कारण आहे फिल्टरपाड्याचा बच्चन अर्थात सर्वांचा लाडका विनोदवीर गौरव मोरे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे गेल्या काही वर्षात गौरवच्या फॅन फॉलोविंगमध्ये तुफान वाढ झालेली आहे. तो घराघरांत लोकप्रिय झाला असून त्याला फिल्टरपाड्याचा बच्चन अशी नवीन ओळख मिळाली आहे. सलग तीन पराभव झालेल्या मुंबईच्या टीमचं आणि चाहत्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आज थेट गौरवने MI च्या ताफ्यात एन्ट्री घेतली आहे.
“ऐका दाजीबा…” या मराठी गाण्यावर खास व्हिडीओ शेअर करत गौरवने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये अभिनेत्याने मुंबई इंडियन्सची जर्सी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे. गौरवच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून MI प्रेमींनी यावर कमेंट्स केल्या आहे.
हेही वाचा : Video : वर्ल्डकपची आठवण काढताच रोहित शर्मा झाला भावुक, कपिल शर्माच्या शोमध्ये म्हणाला, “मी आणि विराटने…”
“भावा मुंबई मेरी जान”, “दादा आज तरी आपण जिंकलो पाहिजे”, “गौरव आला म्हणजे आज नक्की जिंकणार” अशा प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी गौरव आल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.