‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेनंतर आता आणखी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे; याची सध्या मराठी मालिकाविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. अभिनेत्री ईशा केसकर आणि अभिनेता अक्षर कोठारी अभिनीत ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ (Laxmichya Paulanni) ही नवी मालिका २० नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेचं नुकतंच दमदार शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “मोहन गोखले वर्षभर साजरी करायचे दिवाळी, पाडव्याला….”; शुभांगी गोखलेंनी पतीच्या आठवणींना दिला उजाळा

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या नव्या मालिकेत ईशा केसकर आणि अक्षर कोठारीसह अभिनेत्री किशोरी अंबिये, दीपाली पानसरे झळकणार आहे. तसेच या व्यतिरिक्त आणखी कोणते कलाकार या नव्या मालिकेत पाहायला मिळणार हे येत्या काळात समजले. ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ मालिका २० नोव्हेंबरपासून रात्री ९.३० प्रसारित होणार आहे. तसेच यावेळेस सध्या सुरू असलेली मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ रात्री १० वाजता पाहायला मिळणार आहे. तर गेल्या दोन वर्षांहून अधिक प्रेक्षकांचं मनोरंजन करत असलेली मालिका ‘ठिपक्यांची रांगोळी’ प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

हेही वाचा – “या मालिकेमुळे मुलांवरती वाईट संस्कार पडत आहेत…” ‘आई कुठे काय करते’चा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले, म्हणाले…

नुकतंच ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेचं दमदार शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. या शीर्षकगीताचा व्हिडीओ ‘मराठी टेलबझ’ या एंटरटेनमेंट इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील ‘ही’ लाडकी जोडी घेणार निरोप; सव्वा तीन वर्षांचा प्रवास संपणार

दरम्यान, ‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ ही मालिका देखील रिमेक मालिका असल्याचं बोललं जात आहे. ‘स्टार जलशा’वरील लोकप्रिय बंगाली मालिका ‘गातचोरा’ (Gaatchora) आणि ‘स्टार प्लस’वरील ‘तेरी मेरी डोरियाँ’ (Teri Meri Doriyaann) या मालिकेचा रिमेक असल्याची चर्चा सुरू आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Isha keskar and akshar kothari serial laxmichya paulanni title song released pps