‘जय मल्हार’ या मालिकेतून अभिनेत्री ईशा केसकर घराघरांत पोहोचली. तिने साकारलेल्या ‘बानू’ या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. ईशा आपल्या वैयक्तिक आयुष्यात गेल्या अनेक वर्षांपासून अभिनेता ऋषी सक्सेनाला डेट करत आहे. दोघेही सहा वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. प्रेम, लिव्ह इन रिलेशनशिप, लग्न याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला आहे.
हेही वाचा : “दोघांनीही त्या सीनसाठी…”, धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या लिपलॉक सीनवर करण जोहरने मांडले मत, म्हणाला…
ईशा केसकरने अलीकडेच ‘संपूर्ण स्वराज’च्या पॉडकास्ट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी तिने लिव्ह इन रिलेशनशिपबाबत मत मांडले. अभिनेत्री म्हणाली, “मला आधीपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. कॉलेजमध्ये असताना मी लिव्ह इनबद्दल ऐकले होते आणि मी स्वत: आता ती गोष्ट ट्राय करून पाहिली. लोक काय म्हणतील? एवढेच नाहीतर माझे आई-बाबा काय म्हणतील? याची मला कधीच पर्वा नव्हती. माझ्या आयुष्यासाठी फक्त मी जबाबदार आहे. मला जो योग्य वाटला तो निर्णय मी घेतला.”
हेही वाचा : “हिरो आणि हिरोईनला वेगवेगळे मानधन…”, मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडले स्पष्ट मत; म्हणाली, “हा भेदभाव…”
ईशा पुढे म्हणाली, “लिव्ह इन रिलेशनशिपचा माझा अनुभव फार चांगला आहे. प्रत्येक गोष्टीत एकमेकांची मदत करावी लागते. घरातील सोफा बदलताना किंवा कोणतीही गोष्ट बदलताना एकमेकांचे मत जाणून घ्यावे लागते. एकंदर हा सगळा अनुभव खूप छान आहे. आता तो फक्त माझा जोडीदार नसून माझा रुममेट सुद्धा आहे. एकमेकांचा आदर करत आम्ही प्रत्येक निर्णय घेतो.”
“सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, लग्न झाल्यावर प्रत्येक सणवार करावे लागतात. हळदी-कुंकू, मंगळागौर, साडी नेसा या सगळ्या गोष्टी मी मालिकेत केल्या आहेत. आता मी लग्न केले तर या सगळ्या गोष्टी खऱ्या आयुष्यात पुन्हा करायला लावणार… त्यामुळे आता मी हे खरंच करणार नाही. मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आनंदी आहे.” असे ईशाने सांगितले.