‘इश्क का रंग सफेद’ फेम अभिनेत्री स्नेहल रायच्या गाडीचा अपघात झाला आहे. पुण्याच्या दिशेने जात असताना एका भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. यामुळे गाडीचे बंपर आणि मडगार्डचं नुकसान झालंय. ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी वळवण्याने गाडीतील सर्वांचा जीव वाचला आहे. गाडीतील कोणीही गंभीर जखमी झालं नाही.

हेही वाचा – २१ वर्षे मोठ्या नेत्याशी लग्न, चार महिन्यांचं बाळ गमावलं अन्…; अभिनेत्री खुलासा करत म्हणाली, “माझ्या शरीराचा…”

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Pune hit and run case
पुण्यात पुन्हा हिट अँड रन! रस्त्यावर फटाके फोडणाऱ्याला भरधाव कारने दिली धडक; ३५ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू
Man Assaults Woman In Greater Noida
VIDEO : केस पकडले, कानशीलात लगावल्या; तरुणाची भररस्त्यात मैत्रिणीला मारहाण
In Kendur village cousin was nearly crushed under car over land dispute
Video : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
fraud with the lure, virtual currency, Hadapsar police,
पुणे : आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने दोन कोटींची फसवणूक, हडपसर पोलिसांकडून सहाजणांविरुद्ध गुन्हा
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
Police sub-inspector arrested for taking bribe to avoid arrest
अटक न करण्यासाठी लाच घेणारा पोलीस उपनिरीक्षक गजाआड

स्नेहल रायचा ड्रायव्हर आणि तिला गाडीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाल्याची माहिती तिने दिली. त्यानंतर तिने तत्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला फोन केला आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले, असं तिने ‘ई-टाइम्स’ला सांगितलं.

“अचानक एक ट्रक आला आणि माझ्या कारला धडकला. माझ्या ड्रायव्हरचे आभार की त्याने माझा जीव वाचवला. आम्ही पोलिसांना कॉल केला आणि ते १० मिनिटांत तिथे पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनमधील योगेश भोसले यांनी खूप मदत केली. अपघातानंतर मी खूप घाबरले होते, त्यांनी मला ग्लुकोज दिले आणि आवश्यक ती मदत केली,” असं स्नेहलने सांगितलं.

घटनेनंतर ट्रक ड्रायव्हर पळून गेला होता आणि तिच्याकडे वाहनाची कोणतीही माहिती नसल्याने ती एफआयआर दाखल करू शकली नाही. या घटनेने स्नेहल हादरली असून ती हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती समोर आली आहे.