मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकताना दिसत आहे. नुकतच ‘बिग बॉस फेम’ मराठमोळी जोडी अमृता देशमुख व प्रसाद लघाटे यांनी लग्नगाठ बांधली. आता लवकरच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व गायक आशिष कुलकर्णी लग्नबंधनात अडकणार आहेत. अशातच हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्रीही लवकरच लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. अभिनेत्रीच्या मेहंदी व हळदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा-
हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री श्रेनू पारीख लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. श्रेनू तिचा प्रियकर अक्षय म्हात्रेबरोबर लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. श्रेनूने मेहंदी समारंभातील काही फोटो सोशल मीडियावर शेअऱ केले आहेत. मेहंदी मध्ये तिने तिने हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. तसेच तिने फुलांचे दागिने व कपड्यांना साजेसे असे कानातले घातले होते.
श्रेनू पारीखच्या कामाबद्दल बोलायचं झाले तर २०१० मध्ये ‘जिंदगी का हर रंग…गुलाल’ या मालिकेतून तिने टेलिव्हिजन क्षेत्रात प्रवेश केला. तसेच ती ‘इस प्यार को क्या नाम दूं- एक बार फिर’, ‘एक भरम सर्वगुण संपन’, ‘घर एक मंदिर’ सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली. ‘इश्कबाज’ मालिकेतील श्रेनूच्या भूमिकेचे सगळीकडे कौतुक झाले होते.
हेही वाचा- ‘बिग बॉस १७’ मध्ये अंकिता लोखंडेने पतीला मागितला घटस्फोट; म्हणाली, “मला तुझ्याबरोबर…”
तर दुसरीकडे श्रेनूचा होणारा नवरा अक्षयने ‘पिया अलबेला’ मालिकेत नरेन व्यासची भूमिका साकरली आहे. २०२१ मध्ये ‘घर एक मंदिर’ मालिकेच्या सेटवर श्रेणू व अक्षयची पहिल्यांदा भेट झाली. सुरुवातील त्यांच्यात मैत्री झाली व त्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.