९० व्या दशकापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकरांनी सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेद्वारे ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसतायत. मालिकेतील कलाकारांच नात ऑनस्क्रीन जरी वेगळं असलं तरी ऑफ स्क्रीन यांची खूप धमाल सुरू असते. ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात आणि आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचं ‘यीमी यीमी’ (Yimmy Yimmy) गाणं सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतंय. अनेक बॉलीवूड कलाकार तसेच मराठमोळे कलाकारही या गाण्यावर थिरकताना दिसतायत. सगळीकडेच या गाण्याची चर्चा सुरू आहेत. हा ट्रेंड फॉलो करत ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील कलाकार ऐश्वर्या नारकर, अमृता सकपाळ रावराणे आणि एकदा डांगर यांनी ‘यीमी यीमी’ (Yimmy Yimmy) गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. तिघींनी आपापल्या डान्स स्टेप करत प्रेक्षकांना खिळवून ठेवलंय. “आम्ही ट्रेंड फॉलो करतोय. सांगा यातला बेस्ट डान्सर कोण आहे?” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

एका तासातच या रीलला १० हजार व्ह्यूज मिळाले आहेत. तर व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एकाने कमेंट करत लिहिले, “वय हा फक्त एक आकडा आहे.” तर दुसऱ्याने लिहिले, “ऐश्वर्या ताई तुम्हीच बेस्ट डान्सर आहात.” ऐश्वर्या नारकर यांचे व्हिडीओ नेहमी चर्चेत असतात. अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर या दोघांचे व्हिडीओही अनेकदा व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा… Video: नारकर कपलचा दाक्षिणात्य गाण्यावर जबरदस्त डान्स, अविनाश नारकरांची एनर्जी पाहून नेटकरी म्हणाले, “काका, जबरदस्त एकदम…”

दरम्यान, ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत ऐश्वर्या नारकर खलनायिकेची भूमिका साकारत आहेत. ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेत तितीक्षा तावडे नायिकेची भूमिका साकारत आहे तर अजिंक्य ननावरे, श्वेता मेहेंदळे, राहुल मेहेंदळे, जयंत घाटे यांच्याही निर्णायक भूमिका आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jacqueline fernandez yimmy yimmy dance trend by aishwarya narkar amruta sakpal ekta dangar video viral dvr