Bigg Boss Marathi Season 5 : सध्या सर्वत्र ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. या पाचव्या पर्वातील प्रत्येक स्पर्धक पहिल्या दिवसापासून आपापल्या स्ट्रॅडजीनुसार खेळताना दिसत आहेत. वाद, राड्यांनी सुरू झालेल्या ‘बिग बॉस’च्या या पर्वातील स्पर्धक देखील आता घराघरात पोहोचले आहेत. पण सध्या घरातील ‘ए’ गटातील सदस्यांची अधिक चर्चा रंगली आहे. सतत वाद, अपमान ‘ए’ गटातील स्पर्धक करताना दिसत आहेत. त्यापैकी एक म्हणजे जान्हवी किल्लेकर ( Jahnavi Killekar ). ‘बिग बॉस’ घरात गोंधळ घालणाऱ्या जान्हवीला गेल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने चांगलंच झापलं. एवढंच नव्हे तर तिला थेट ‘बिग बॉस’मधून बाहेर काढण्याची धमकी दिली. वर्षा उसगांवकरांचा केलेला अपमान आणि गोंधळ यामुळे रितेशने जान्हवीला इमेज किल्लर म्हटलं. याच पार्श्वभूमीवर जान्हवीबरोबर काम केलेल्या एका अभिनेत्याने आपलं मत मांडलं आहे. जान्हवीचा मित्र नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा